मुंबई - बॉलिवूडमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. फार पूर्वीपासून बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये 'दहिहंडी'चा उत्सव धुमधडाक्यात साजरा करताना पाहायला मिळतो. मात्र, बॉलिवूडच्या या गाण्यांशिवाय 'दहिहंडी'चा कार्यक्रम अपूर्ण वाटतो. २४ आणि २४ तारखेला देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त बॉलिवूडमध्ये राधा-कृष्णावर आधारित ही गाणी नक्कीच या उत्सवाचा आनंद द्विगुणीत करतील.
राधे राधे -
अलिकडेच अभिनेता आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीमगर्ल' चित्रपटातील 'राधे राधे' हे गाणे प्रदर्शित झाले आहे. राधा-कृष्नावर आधारित असलेलं हे गाणं सध्या प्रचंड लोकप्रिय होत आहे. जन्माष्टमीच्या पूर्वीच हे गाणं प्रदर्शित झाल्यामुळे 'दहिंहंडी'च्या उत्सवामध्येही या गाण्याची क्रेझ असेल.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
ओ कान्हा सो जा जरा -
'बाहुबली २'मधील श्रीकृष्णासाठी गायलेलं हे सुमधुर गाणं हे देखील या उत्सवात आणखी भर घालेल.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
राधा कैसे न जले -
आमिर खान आणि ग्रेसी सिंग यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याचीही लोकप्रियता पाहयला मिळते. उदित नारायण आणि आशा भोसले यांनी हे गाणं गायलं आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
गो गो गोविंदा -
'ओह माय गॉड' चित्रपटातील हे गाणं सर्वांना 'दहिंहंडी'च्या उत्सवात थिरकायला भाग पाडते. अक्षय कुमारने या चित्रपटात श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती. तर, सोनाक्षी सिन्हा आणि प्रभू देवा यांनी या गाण्यावर धमाल डान्स केला होता.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
मैय्या यशोदा -
'हम साथ साथ है' चित्रपटातल्या या गाण्याची आजही चाहत्यांमध्ये लोकप्रियता पाहायला मिळते. नटखट श्रीकृष्णावर आधारित या गाण्यात करिश्मा कपूर, सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, सलमान खान, तब्बु आणि मोहनीश बहल यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आलं होतं.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
राधा नाचेगी -
'तेवर' चित्रपटातली सोनाक्षी सिन्हा आणि अर्जुन कपूरचं हे गाणं देखील जन्माष्टमीच्या उत्सवात आपल्याला थिरकायला भाग पाडेल.
वो कृष्णा है -
विवेक ओबेरॉयच्या 'किसना' चित्रपटातील हे गाणं आजही मोठ्या प्रमाणात ऐकलं जातं.