मुंबई - बॉलिवूड पार्श्वगायिका नेहा कक्कर हिने हिंदी चित्रपटसृष्टीतील गायकांना पैसे दिले जात नसल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. गायक राहुल वैद्यनेही असेच आरोप लावले आहेत. बिग बॉस १४ चा स्पर्धक असलेल्या राहुल वैद्यने गायकांना रेकॉर्डिंगचे पैसे मिळत नसल्याचे सांगितले आहे.
एप्रिलमध्ये नेहा म्हणाली होती, ''बॉलिवूडमध्ये आम्हाला गायनाचे पैसे मिळत नाहीत. त्यांना वाटतं की आम्ही सुपरहिट गाणे दिले तर मग शोजमधून पैसे कमवू. मला लाईव्ह कॉन्सर्टमधून चांगले पैसे मिळतात. परंतु बॉलिवूडमध्ये असे नाही. आमच्याकडून गाणे गाऊन घेतल्यानंतर आम्हाला पैसे दिले जात नाही.''
राहुलनेही वृत्त संस्थेला असेच सांगितले. तो म्हणाला, ''हे खरं आहे की, गायकांना सिनेमाच्या रेकॉर्डिंगचे पैसे मिळत नाहीत आणि हे सांगताना मला कोणतीच लाज वाटत नाही. परंतु होय, लाईव्ह परफॉर्मन्समधून गायकांना भरपूर पैसे मिळतात.''