ETV Bharat / sitara

बॉलिवूड मेकअप आर्टिस्ट गोडांबेला मुंबईत कोकेनसह अटक

बॉलिवूडच्या ड्रग संबंधाची चौकशी करणाऱ्या नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने बॉलिवूड मेकअप आर्टिस्ट आणि हेअरस्टाईलस्ट सूरज गोडांबे याला मुंबईत अटक केली आहे. त्याच्याकडून कोकेन जप्त करण्यात आले आहे.

makeup artist Godambe
सूरज गोडांबे
author img

By

Published : Dec 10, 2020, 2:39 PM IST

मुंबई - नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने गुरुवारी बॉलिवूड मेकअप आर्टिस्ट आणि हेअर स्टायलिस्ट सूरज गोडांबे याला मुंबईत अटक केली असून त्याच्याकडून कोकेन जप्त केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

बॉलिवूड-ड्रग्सच्या कथित नेक्ससची चौकशी करत असलेल्या एनसीबीने छापा टाकल्यानंतर गोडांबेला अटक केली, असे अधिकाऱ्याने सांगितले.

गोडांबे लोकप्रिय मेकअप कलाकार आणि हेअर स्टायलिस्ट आहे आणि काही मोठ्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये त्याने काम केले आहे, असे अधिकारी म्हणाले. त्याला न्यायालयात हजर केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्स प्रकरणात एनसीबी मंगळवारपासून मुंबईत शोध घेत असून ड्रग पेडलर रिजेल महाकालसह दोन जणांना अटक केली आहे.

हेही वाचा - स्वतःचे संरक्षण कसे करावे हे मुलांना शिकवायला हवे - आयुष्मान खुराणा

या चौकशीत तपास यंत्रणेने अडीच कोटी रुपयांचे 'चरस' आणि १३.५१ लाख रुपये रोख जप्त केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा - सोनू सूद बनला २०२०चा टॉप ग्लोबल आशियाई सेलिब्रिटी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.