ETV Bharat / sitara

Bogg Bos 15: उमर रियाझ शोमधून बाहेर, 'पक्षपात' झाल्याचा चाहत्यांचा आरोप - उमर रियाझला बिग बॉसमधून हाकलले

बिग बॉस 15 चा स्पर्धक उमर रियाझला शोमधून बाहेर काढण्यात आले आहे. शो अंतिम टप्प्यात आला आहे आणि उमर या शोमधील सर्वात मजबूत स्पर्धकांपैकी एक होता, त्यामुळे त्याच्या चाहत्यांची निराशा झाली आहे. उमरच्या चाहत्यांनी ट्विटरवर त्याच्या शोमधून बाहेर जाण्याला अन्यायकारक आणि पक्षपाती म्हटले आहे.

Bogg Bos 15
Bogg Bos 15
author img

By

Published : Jan 8, 2022, 4:34 PM IST

मुंबई (महाराष्ट्र): बिग बॉस 15 मध्ये चार महिन्यांहून अधिक काळ राहिल्यानंतर आणि फिनालेच्या काही आठवड्यांपूर्वी, उमर रियाझला शोमधून बाहेर काढण्यात आले. त्याच्या हकालपट्टीनंतर उमरच्या चाहत्यांनी ट्विटरवरत्याला तुफान पाठिंबा दर्शवत मोहीम चालवली आहे. बिग बॉस १५ शोचे निर्माते पक्षपाती असल्याचा आरोप केला चाहत्यांकडून केला जात आहे.

शुक्रवारी रात्री उमरचा भाऊ आणि बिग बॉस 13 चा फायनलिस्ट असीम रियाझ यांनी ट्विटरवर लिहिले, "चांगला खेळलास. Love you bro."

दरम्यान बिग बॉस 14 मध्ये सहभागी झालेली असीमची गर्लफ्रेंड हिमांशी खुराणा हिने शोवर जोरदार टीका केली आहे.

"त्यांना जे हवं ते करतात.... व्होट्स कराओ और फिर निकाल दो.... ऑर बश कर के मेंटल हेल्थ भी खराब कर दो..... वेल प्ले उमर ," असे तिने ट्विट केले आहे.

  • They do what they wana do .... votes krwao or fir nikal do .... or bash kar karke mental health bhi khraab kar do ..... well played umar @realumarriaz

    — Himanshi khurana (@realhimanshi) January 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दुसर्‍या ट्विटमध्ये हिमांशीने लिहिले की, "आश्चर्य नही हर सिझनमें सेम होता है.... इस लिए क्या ही वोटिंग अपील डाले ऑर क्या वोट मांगे...... आम्ही तुमच्या सोबत आहोत उमर."

असीम आणि हिमांशीच्या ट्विटवरून उमर आता चालू शोचा भाग नाही असे सुचवले गेले आहे.

चाहते आणि शोबिझमधील इतर सदस्य देखील उमरच्या समर्थनार्थ बाहेर आले आणि निर्मात्यांना पक्षपाती आणि अन्यायकारक असल्याबद्दल आवाज उठवला आहे. 'नो उमर रियाझ नो बीबी१५' ट्विटरवर ट्रेंड करत आहे कारण शोचे फॉलोअर्स फिनालेपूर्वी उमरच्या बेदखल झाल्यामुळे स्पष्टपणे नाराज आहेत.

"उमरला बाहेर काढण्यात आले हे धक्कादायक आहे ... बिग बॉसचा अजेंडा माहित नाही, पण उमर रियाझ चांगला खेळला," असे अभिनेता करेनवीर बोहराने ट्विट केले आहे.

"उमर रियाझची फॅन फॉलोइंग खूप मोठी होती तरीही तो कसा बाहेर पडला.. धक्कादायक. पक्षपाती शो," असे एका चाहत्याने कमेंट केली आहे.

उमर हा व्यवसायाने डॉक्टर आहे. त्याने बिग बॉस 15 च्या घरामध्ये भरपूर प्रसिध्दी मिळवली आहे. विशेषत: त्याच्या खेळाची शैली, लढाऊपणा आणि सह-स्पर्धक रश्मी देसाई हिच्याशी त्याचे असलेले समीकरण यामुळे तो कायम प्रसिध्दीच्या झोतात राहिला होता.

हेही वाचा - बिग बॉस 15: सलमान खानने घेतली करण कुंद्राची शाळा, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.