ETV Bharat / sitara

कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज यांचे ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ मालिकेच्या टीमला शुभाशीर्वाद! - Blessings to the team of 'Swarajya Saudamini Tararani'

'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' (Swarajya Saudamini Tararani) या मालिकेनिमित्त नुकतीच कोल्हापुरातील ताराराणी चौक स्टेशन रोड येथे महाराणी ताराराणी यांना मानवंदना दिली गेली. या सोहळ्याला कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj), इतिहासकार जयसिंगराव पवार (Historian Jaysingrao Pawar)आणि खासदार आणि मालिकेचे निर्माते डॉ. अमोल कोल्हे, सोनी मराठी चे बिझनेस हेड अजय भाळवणकर (Ajay Bhalvankar) यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

स्वराज्य सौदामिनी ताराराणी’
स्वराज्य सौदामिनी ताराराणी’
author img

By

Published : Nov 17, 2021, 3:48 PM IST

जीवात जीव आणि श्वासात श्वास असेपर्यंत हे स्वराज्य अबाधित राहील आणि त्या औरंग्याची कबर दख्खनच्या मातीत खोदली जाईल!’ हे स्वराज्याबद्दलची जाज्वल्य निष्ठा आणि करारीपणा व्यक्त करणारे ताराराणींचे शब्द आणि युद्धभूमीवर मोगलांना सळो की पळो करून सोडणारे त्यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले आहे, अशा ताराराणींची गाथा सोनी मराठीवर 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' (Swarajya Saudamini Tararani) या मालिकेतून उलगडणार आहे. यात ताराराणीच्या भूमिकेत आहे अभिनेत्री स्वरदा थिगळे (Actress Swarada Thigale). ही भूमिका साकारणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखेच आहे, असे ती म्हणाली.

करारी नजर, स्पष्ट शब्दोच्चार, पहाडी आवाज आणि शिवकुळातले जाज्वल्य तेज यांमुळे स्वरदाला प्रेक्षकांची विशेष प्रशंसा लाभते आहे. स्वरदाच्या आजवरच्या अभिनय प्रवासातले हे एक वेगळे आव्हानात्मक रूप आहे. डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe)आणि जगदंब क्रिएशन्स निर्मित ही मालिका ताराराणींचा दुर्दम्य आत्मविश्वास, स्वराज्याप्रती अढळ निष्ठा, स्वराज्यासाठी केलेला त्याग आजच्या पिढीसमोर मांडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्य अबाधित राखून ते वर्धिष्णू करणार्‍या जाज्वल्य इतिहासाचे अपरिचित पर्व ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेतून उलगडणार आहे.

या मालिकेनिमित्त नुकतीच कोल्हापुरातील ताराराणी चौक स्टेशन रोड येथे महाराणी ताराराणी यांना मानवंदना दिली गेली. या सोहळ्याला कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj), इतिहासकार जयसिंगराव पवार (Historian Jaysingrao Pawar)आणि खासदार आणि मालिकेचे निर्माते डॉ. अमोल कोल्हे, सोनी मराठी चे बिझनेस हेड अजय भाळवणकर (Ajay Bhalvankar) यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. कलाकार स्वरदा थिगळे, संग्राम समेळ, रोहित देशमुख, अमित देशमुख, यतिन कार्येकर, आनंद काळे हे उपस्थित होते. मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले आहे, अशा ताराराणींची गाथा सोनी मराठी वाहिनीवर स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेतून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.

'मराठ्यांच्या मुली ज्या हाताने फुगडी खेळतात, त्याच हाताने गर्दनही मारू शकतात!' ह्या उद्गारातून महाराणी ताराराणींची लढवय्या व्यक्तिमत्त्वाची झलक दिसली आहे. ताराराणी आणि औरंगजेब यांना छोट्या पडद्यावर समोरासमोर पाहणे, इतिहासातला तो काळ बघायला मिळणे हा प्रेक्षकांसाठी थरारक अनुभव असणार आहे.

‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ (Swarajya Saudamini Tararani) ही ऐतिहासिक मालिका सोम.-शनि.संध्या. ७:३० वा. सोनी मराठी वाहिनीवरप्रसारित होते.

हेही वाचा - Aniket VishwasRao : मराठी अभिनेता अनिकेत विश्वासरावसह तिघांवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.