ETV Bharat / sitara

बिग बॉस : खराब वागणुकीमुळे शोमधून 'हाकलून' देण्यात आलेले स्पर्धक - बिग बॉसमध्ये राडा

बिग बॉस हा शो वादग्रस्त असतो मात्र इथे मारहान खपवून घेतली जात नाही. ज्या स्पर्धकांनी हिंसा करण्याचा प्रयत्न केला त्यांना घराबाहेर काढण्यात आले. जाणून घ्या अशाच काही स्पर्धकांबद्दल...

Bigg Boss
बिग बॉस
author img

By

Published : Dec 18, 2020, 5:29 PM IST

मुंबई - बिग बॉस हा वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शोमध्ये घाणेरडी भाषा, ओंगळवाणे वागणे, कमरेखालचे विनोद यांची नेहमीच रेलचेल पाहायला मिळाली आहे. असे असले तरी या शोच्या निर्मात्यांनी एक परंपरा जपली आहे, ती म्हणजे शारीरिक मारहान न करण्याची. बिग बॉसच्या घरात ज्या स्पर्धकांनी मारहान करण्याचा पर्यत्न केला त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

प्रत्येक सिझनमध्ये मारहान न करण्याची सूचना स्पर्धकांना देण्यात येते. परंतु स्पर्धक स्वतःवरचे नियंत्रण गमावतात आणि हिंसक बनतात. अशांना तातडीने बिग बॉसमधून हाकलले गेल्याचे आजवर पाहायला मिळाले आहे.

विकास गुप्ता

विकास हा बिग बॉसच्या १२ व्या सिझनमधील उत्तम स्पर्धक होता. अर्शी खानसोबत झालेल्या भांडणामुळे त्याला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्याने अर्शी खानला भांडणात स्विंमिंग पूलमध्ये ढकलून दिले होते.

मधुरिमा तुली

मधुरिमा आणि तिचा माजी प्रियकर विशाल आदित्य सिंह बिग बॉसच्या १३ व्या सिझनमध्ये सहभागी झाले होते. दोघांच्यातील भांडण चांगलेच गाजले होते. त्यांचे संबंध पूर्ण बिघडले होते. विशालने मधुरिमावर पाणी फेकले आणि मग ती उठली आणि फ्राईंग पॅनने त्याला मारण्यास सुरूवात केली, यामुळे तो जखमी झाला. त्यानंतर मधुरिमाला घर सोडण्यास सांगण्यात आले.

झुबेर खान

झुबेरने ११ व्या हंगामात तथाकथित "दादा" म्हणून प्रवेश केला. तथापि, महिलांविषयी असभ्य आणि अनादर असलेल्या स्वभावामुळे त्याला प्रवेशानंतर काही दिवसांतच बाहेर जाण्यास सांगण्यात आले. शोचे होस्ट सलमान खान त्याच्या वागण्यामुळे चिडला आणि त्याला घरातून जाण्यास सांगितले.

प्रियंक शर्मा

सीझन ११ चा हाऊसमेट प्रियंक हा एक मजबूत स्पर्धक होता. तथापि, सहकारी स्पर्धक आकाश दादलानीशी झालेल्या झुंजीदरम्यान त्याने हात उगारल्यामुळे त्याला शो सोडण्यास सांगण्यात आले. नंतर प्रियंकला पुन्हा शोमध्ये आणण्यात आले.

स्वामी ओम

बिग बॉसच्या इतिहासातील स्वामी ओम सर्वात विचित्र स्पर्धक होता. तो १० व्या हंगामात सहभागी स्पर्धक होता. बाणी जे हिच्यावर स्वयंघोषित गॉडमॅनने मूत्र फेकण्याचा विचित्र कृत्य केल्यामुळे निर्मात्यांनी त्याला घरी पाठवले.

कुशाल टंडन

कुशाल बिग बॉसच्या सातव्या सत्रात स्पर्धक होता. शोमध्ये गौहर खानसोबत त्याने केलेल्या रोमान्समुळे तो चर्चेत होता. व्हिजे अँडीने गौहरबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर प्रकरण बिघडले. कुशालने अँडीची मान पकडली आणि याच कारणामुळे त्याला बिग बॉस शो सोडावा लागला.

पूजा मिश्रा

पूजा शोच्या पाचव्या हंगामातील सर्वात वादग्रस्त व्यक्तींपैकी एक होती. मध्यरात्री तिला बेदखल करण्यास उद्युक्त करणाऱ्या शोनाली नागरानीशी "गेट ऑफ माय बॅक" ही लढाई नव्हती, तर सिद्धार्थ भारद्वाज याच्याशी तिचा वाद झाला होता. रागाच्या भरात तिने सिद्धार्थला ढकलले होते, त्यानंतर निर्मात्यांनी तिला घराबाहेर काढले.

डॉली बिंद्रा आणि समीर सोनी

अस्थिर वर्तन आणि अपमानास्पद भाषेबद्दल परिचित असलेल्या डॉली बिंद्राने श्वेता तिवारीला वाईट पध्दतीने ओरडल्यानंतर तिला बिग बॉस ४ च्या घरातून काढून टाकले होते. समीरने मध्यस्थी केली आणि लवकरच दोघांमध्ये जोरदार झगडा झाला. त्यानंतर त्यांच्यातील हिंसक वर्तनामुळे त्यांना तेथून निघण्यास सांगण्यात आले.

कमल राशिद खान (केआरके)

केआरके बिग बॉसच्या तिसर्‍या सत्रात दिसला होता. कमलने रोहित वर्माच्या दिशेने बाटली फेकून मारली आणि ती रोहितला न लागता शमिता शेट्टीला लागली. यामुळे ती जखमी झाली होती. त्यानंतर निर्मात्यांनी त्याला हा कार्यक्रम सोडायला सांगायला जास्त वेळ घेतला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.