ETV Bharat / sitara

बिग बॉस 15: सलमान खानने घेतली करण कुंद्राची शाळा, पाहा व्हिडिओ - करण कुंद्रावर भडकला सलमान

बिग बॉस १५ मध्ये तेजस्वी प्रकाशशी गैरवर्तन केल्याबद्दल स्पर्धक करण कुंद्राचा क्लास घेताना सलमान खान दिसणार आहे. सलमानने तेजस्वीला हेही सांगितले की करण तिचा बॉयफ्रेंड असूनही तिची गरज असताना तो कधीही तिच्या पाठीशी उभा राहिला नाही.

बिग बॉस 15
बिग बॉस 15
author img

By

Published : Jan 8, 2022, 3:51 PM IST

मुंबई - बिग बॉस 15 च्या वीकेंड का वार एपिसोडमध्ये, होस्ट सलमान खान तेजस्वी प्रकाशशी गैरवर्तन केल्याबद्दल स्पर्धक करण कुंद्राचा क्लास घेताना दिसणार आहे. सलमानने तेजस्वीला हेही सांगितले की करण तिचा बॉयफ्रेंड असूनही तिची गरज असताना तो कधीही तिच्या पाठीशी उभा राहिला नाही.

बिग बॉस 15 च्या आगामी एपिसोडमध्ये सलमान खान करण कुंद्राला सुनावताना दिसणार आहे. सलमानच्या म्हणण्यानुसार, करणने अनेकदा तेजस्वीला शोमधील त्याचा मित्र उमर रियाझची माफी मागायला लावली आहे. वीकेंड का वार एपिसोडमध्ये प्रत्येक स्पर्धकाला आरसा दाखवणाऱ्या होस्टने, उमरने तेजस्वीला पाठिंबा देण्याची तयारी कशी व्यक्त केली हे देखील दाखवले. जेव्हा सलमान म्हणतो: "करणने तुझा बॉयफ्रेंड असूनही तुला कधीही मदत केली नाही," हे ऐकताना तेजस्वी स्वतःला सावरु शकत नाही आणि तिला रडू कोसळते. सलमान करणलाही सांगतो की, "तेजस्वी तुझी प्राथमिकता अजिबात नाही." तेजस्वीशी केलेल्या वागणुकीबद्दल कुंद्राची निंदा करत सलमान खान त्याला म्हणतो की, "भूमिका घे आणि एका माणसासारखे वाग."

शो जसजसा फिनालेकडे सरकत आहे तसतसे स्पर्धक फिनालेपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व मैत्री आणि नातेसंबंध विसरून जोरदार खेळ करत आहेत. नुकत्याच झालेल्या 'बिग बॉस की अदालत' टास्क दरम्यान, करण आणि तेजस्वीच्या नात्याला तडा गेला, कारण तेजस्वीला VIPS - उमर रियाझ, करण कुंद्रा, रश्मी देसाई आणि राखी सावंत यांनी टास्क जिंकू न दिल्याने बळी पडल्यासारखे वाटले.

करणने तिच्याऐवजी शमिता शेट्टीची बाजू घेतल्याने तेजस्वी अधिक दुखावली गेली होती. दरम्यान, आगामी भागामध्ये उमर रियाझला घरातून बाहेर काढले जाऊ शकते. अधिकृतपणे कशाचीही पुष्टी झाली नसली तरी त्याचा भाऊ आणि माजी स्पर्धक असीम रियाझच्या ट्विटनंतर चाहते सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करत आहेत.

हेही वाचा - "अँड जस्ट लाइक दॅट" मालिकेत साडीचा अपमान, सोनम कपूर नाराज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.