ETV Bharat / sitara

Bigg Boss 15: असीम रियाझने भाऊ उमर रियाझच्या 'अयोग्य' हकालपट्टीवर दिली प्रतिक्रिया - असीम रियाझची प्रतिक्रिया

बिग बॉस 15 च्या वीकेंड का वार एपिसोडमध्ये उमर रियाझला ( Umar Riaz eviction ) बाहेर काढण्यात आले. या निर्णयावर त्याच्या चाहत्यांनी टीका करीत त्याचे बाहेर जाणे हे अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. उमरच्या हकालपट्टीवर प्रतिक्रिया देताना, त्याचा भाऊ असीम रियाझनेही ( Asim Riaz reacts to brother Umar Riaz eviction ) चाहत्यांच्या भावनांचे समर्थन केले. बिग बॉसमधून अशा प्रकारे स्पर्धकाला अन्याय करुन बाहेर काढण्याची ही पहिलीच वेळ नसल्याचे त्याने म्हटलंय.

उमरच्या हकालपट्टीवर असिम रियाझची प्रतिक्रिया

author img

By

Published : Jan 12, 2022, 12:32 PM IST

मुंबई (महाराष्ट्र) - बिग बॉस 15 च्या वीकेंड का वार एपिसोडमध्ये उमर रियाझला ( Umar Riaz eviction ) बाहेर काढण्यात आले. या निर्णयावर त्याच्या चाहत्यांनी टीका करीत त्याचे बाहेर जाणे हे अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. उमरच्या हकालपट्टीवर प्रतिक्रिया देताना, त्याचा भाऊ असीम रियाझनेही ( Asim Riaz reacts to brother Umar Riaz eviction ) चाहत्यांच्या भावनांचे समर्थन केले. बिग बॉसमधून अशा प्रकारे स्पर्धकाला अन्याय करुन बाहेर काढण्याची ही पहिलीच वेळ नसल्याचे त्याने म्हटलंय.

उमरच्या हकालपट्टीवर असिम रियाझची प्रतिक्रिया

बिग बॉसमध्ये पक्षपात झाल्याचा चाहत्यांचा आरोप

बिग बॉस 15 मध्ये चार महिन्यांहून अधिक काळ राहिल्यानंतर आणि फिनालेच्या काही आठवड्यांपूर्वी, उमर रियाझला शोमधून बाहेर काढण्यात आले. त्याच्या हकालपट्टीनंतर उमरच्या चाहत्यांनी ट्विटरवरत्याला तुफान पाठिंबा दर्शवत मोहीम चालवली आहे. बिग बॉस १५ शोचे निर्माते पक्षपाती असल्याचा आरोप केला चाहत्यांकडून केला जात आहे.

दरम्यान बिग बॉस 14 मध्ये सहभागी झालेली असीमची गर्लफ्रेंड हिमांशी खुराणा हिने शोवर जोरदार टीका केली आहे."त्यांना जे हवं ते करतात.... व्होट्स कराओ और फिर निकाल दो.... ऑर बश कर के मेंटल हेल्थ भी खराब कर दो..... वेल प्ले उमर ," असे तिने ट्विट केले आहे.

दुसर्‍या ट्विटमध्ये हिमांशीने लिहिले की, "आश्चर्य नही हर सिझनमें सेम होता है.... इस लिए क्या ही वोटिंग अपील डाले ऑर क्या वोट मांगे...... आम्ही तुमच्या सोबत आहोत उमर."

'नो उमर रियाझ नो बीबी१५' ट्विटरवर ट्रेंड

चाहते आणि शोबिझमधील इतर सदस्य देखील उमरच्या समर्थनार्थ बाहेर आले आणि निर्मात्यांना पक्षपाती आणि अन्यायकारक असल्याबद्दल आवाज उठवला आहे. 'नो उमर रियाझ नो बीबी१५' ट्विटरवर ट्रेंड करत आहे कारण शोचे फॉलोअर्स फिनालेपूर्वी उमरच्या बेदखल झाल्यामुळे स्पष्टपणे नाराज आहेत.

उमर हा व्यवसायाने डॉक्टर आहे. त्याने बिग बॉस 15 च्या घरामध्ये भरपूर प्रसिध्दी मिळवली आहे. विशेषत: त्याच्या खेळाची शैली, लढाऊपणा आणि सह-स्पर्धक रश्मी देसाई हिच्याशी त्याचे असलेले समीकरण यामुळे तो कायम प्रसिध्दीच्या झोतात राहिला होता.

उमर रियाझच्या भावानेही गाजवले होते बिग बॉसचे १३ वे पर्व

बिग बॉसचा १३ वा सिझन असिम रियाझने गाजवला होता. या शोचा तो उपविजेता ठरला होता. त्यावेळी असिम लोकप्रियतेत खूप पुढे गेला होता. इतका की त्याचा फोटो जॉन सीनाने शेअर केला होता.

हेही वाचा - अनन्या पांडेच्या पोस्टवर शाहिद कपूरच्या कॉमेंटने वेधले नेटिझन्सचे लक्ष

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.