मुंबई - कोविड-१९ च्या आजारातून मुक्त झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी बहुचर्चित कौन बनेगा करोडपतीच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. त्यांनी या सेटवरील काही फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
कौन बनेगा करोडपती शोचा १२ वा सिझन सुरू होत आहे. याच्या प्रमोशनचा भाग शूट करण्यात आला. यावेळी सेटवरील काही फोटो बच्चन यांनी शेअर केले. या शोचे प्रॉडक्शन युनिट निळ्या रंगाच्या पीपीई कीटमध्ये होते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
केबीसीच्या सेटवर निळ्या रंगाचा पीपीई समुद्र पाहायला मिळाल्याचे बच्चन यांनी सांगत, कामावर पुन्हा परतल्याचे फोटोंच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. २०२० हे बच्चन यांच्यासाठी कौन बनेगा करोडपतीचे २० वे वर्ष आहे.
कौन बनेगा करोडपती हा शो २००० ला सुरू झाला. तेव्हापासून अपवाद वगळता बच्चन या शोचे सूत्रसंचालन करीत आले आहेत. आत्तापर्यंत या शोचे ११ सिझन पार पडले असून बाराव्या सिझनची निर्मिती सुरू आहे.
या वर्षी मे महिन्यामध्ये या शोचा आरंभ होणार होता. मात्र, कोरोनाच्या साथीमुळे हा शो होऊ शकला नव्हता.