ETV Bharat / sitara

‘जागतिक संगीत दिना’निमित्त सावनी रवींद्रची आली नवी म्युझिकल सीरिज - launch music seies

यंदाच्या संगीत दिनाचं औचित्य साधून सुमधूर गळ्याची गायिका सावनी रवींद्रने सोशल मीडियावरून नवी म्युझिकल सीरिज प्रदर्शित केली आहे.

सावनी रविंद्र
author img

By

Published : Jun 20, 2019, 11:43 PM IST

जागतिक संगीत दिन हा संगीताशी निगडीत प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एखाद्या सणासारखा असतो. यंदाच्या संगीत दिनाचं औचित्य साधून सुमधूर गळ्याची गायिका सावनी रवींद्रने सोशल मीडियावरून नवी म्युझिकल सीरिज प्रदर्शित केली आहे.

जागतिक संगीत दिनाविषयी सावनी रवींद्र सांगते, “संगीत हा ज्यांचा श्वास आहे आणि संपूर्ण आयुष्य ज्यांनी संगीताला वाहिले आहे, त्या आमच्यासारख्या संगीत क्षेत्रातल्या सर्वांसाठी खरं तर रोजच संगीत दिन असतो.”

ती आपल्या सीरिजविषयी माहिती देते, “आम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत संगीतच जगतो. पण जे संगीत क्षेत्रात नाहीत, त्यांच्याही आयुष्यात संगीताला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणूनच त्यांचा संगीत दिन खास व्हावा ह्यासाठी मला असं वाटतं, गायिका म्हणून माझं हे कर्तव्य आहे की, मी त्यांना स्वरमयी भेट द्यावी. त्यामुळे जागतिक संगीत दिनानिमित्ताने त्यांचा संपूर्ण आठवडाच संगीतमयी करावा, असं मला वाटलं आणि मी ही नवी सीरिज सुरू केली. सध्या रोज एक व्हिडियो मी सोशल मीडियावर अपलोड करते आहे.”

या सीरिजमध्ये जुन्या नव्या मराठी-हिंदी गाण्यांचा संगम आहे. सावनी म्हणते, “अभंग, रोमँटिक, पावसावरचे गाणे, अशा वेगवेगळ्या मुड्सच्या गाण्यांचा समावेश ह्यात आहे. आजकाल लोकांना लाइव आणि रॉ ऐकायला आवडतं. त्यामुळेच ह्याचं वैशिष्ठ्य आहे, या गाण्याच्या चित्रीकरणा वेळी कुठेही ब्रेक किंवा रिटेक न घेता ही गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. ह्यासाठी ‘वन टेक जॅमिंग सेशन’ असा हॅशटॅगही मी वापरलाय. ही गाणी लोकांना आवडतायत. हे सोशल मीडियावरून सीरिजला मिळत असलेल्या रसिकांच्या रिस्पॉन्सवरून समजतंय. त्यामूळ खूप आनंद होतोय. ”

Intro:मुंबई - मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांवरून सोनू तुझामाझ्यावर भरवसा नाय काय या गाण्यातून पालिकेला खिल्ली उडविणाऱ्या रेड एफएम 93.5 फेम आरजे मलिष्का व त्यांच्या सहकाऱ्यांनाच पालिकेने त्यांची काम मुंबईकरांपर्यत पोहचवण्यासाठी आज निमंत्रित केलं होतं. Body: यंदा पुन्हा पावसाळ्यात पालिकेला मुंबईतील खड्डे व इतर नागरी समस्यांवरून टीकेची धनी होण्यापासून वाचण्यासाठी पालिका आयुक्तांनी
मलिष्कापुढे शरणागती पत्कारली आहे.
पालिका आयुक्तांनी आरजे मलिष्का व त्यांचे सहकारी तसेच मराठी सिने‍ अभिनेते अजिंक्य देव यांना सोबत घेऊन वरळी येथील महापालिकेच्या लव्हा‍ग्रोव्ह पंपीग स्टेशनला तसेच महापालिका मुख्यालयातील आप्तकालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन त्यांची ओळख करून दिली. Conclusion:यंदा पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यावर खड्डे न पडण्याचा व पाणी न तुंबण्याचा निर्धार पालिका आयुक्तांनी केला असून त्याकरिता कोणत्या उपाययोजना केल्या, याबाबत आयुक्तांनी मलिष्काला माहिती दिली.
या पाहणी भेटीनंतर मलिष्काने पालिकेसमोर माघार घेतली का असा सवाल उपस्थित केला जातोय.
महानगरपालिका मुंबईवासियांना विविध नागरी सेवा सुविधा दर्जेदारपणे पुरविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करित असते. मात्र त्या कामांचे प्रतिबिंब मुंबईकरांपर्यंत दिसण्यासाठी प्रसार माध्यमे - सोशल मिडिया ही प्रसारमाध्यमे महत्वपूर्ण भूमिका बजावितात म्हणून त्यांनी अशी सर्व नागरी सेवा – सुविधांची कामे मुंबईकर सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी यावेळी केले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.