ETV Bharat / sitara

‘बायको अशी हव्वी’ आणि ‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकांत ‘विवाह विशेष सप्ताह’!

author img

By

Published : Jun 20, 2021, 9:50 PM IST

कलर्स मराठीवरील ‘बायको अशी हव्वी’ आणि ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकांमध्ये येत्या आठवड्यात जान्हवी व विभास आणि शंतनू व शर्वरी यांचा लग्नसोहळा बघायला मिळणार आहे. ‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेमध्ये सप्तपदी जरा विशेष असणार आहे, कारण शंतनू शर्वरीला उचलून फेरे पूर्ण करणार आहे.

bayko ashi havi and shubhmangal online marathi serial special marriage episode
‘बायको अशी हव्वी’ आणि ‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकांत ‘विवाह विशेष सप्ताह’!

महाराष्ट्रातील लॉकडाऊन शिथिल होऊ लागलाय आणि टेलिव्हिजन मालिकांमध्ये लग्नसराईचा मोसम सूर झालाय. कलर्स मराठीवरील ‘बायको अशी हव्वी’ आणि ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकांमध्ये येत्या आठवड्यात जान्हवी व विभास आणि शंतनू व शर्वरी यांचा लग्नसोहळा बघायला मिळणार आहे. ‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेमध्ये सप्तपदी जरा विशेष असणार आहे, कारण शंतनू शर्वरीला उचलून फेरे पूर्ण करणार आहे. तर ‘बायको अशी हव्वी’ या मालिकेत विभासचे सत्य अजून जान्हवीसमोर आले नाहीये. त्याने लपवलेले हे सत्य तिच्यासमोर कधी आणि कसे येईल तसेच राजेशिर्के कुटुंबात जान्हवी कशी रमेल हे बघणे प्रेक्षकांसाठी रंजक असणार आहे.

लग्न म्हणजे जन्मभराचे ऋणानुबंध. नव्या आयुष्याची सुरुवात. प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा क्षण. आपल्या कुटुंबाला मागे सोडून नवर्‍याच्या घरी मुलगी जाते ती फक्त आपल्या जोडीवर असलेल्या विश्वास आणि प्रेमाखतर. लग्नानंतर मुलीचे आयुष्य संपूर्णपणे बदलून जाते. या गोष्टींचा प्रत्यय ‘बायको अशी हव्वी’ आणि ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकांतून येईल.

बायको अशी हव्वी मालिकेमध्ये विभास राजेशिर्के आणि जान्हवी सातारकर यांचे लग्न अतिशय साध्या पध्दतीने पार पडणार आहे. दोघांचाही अस्सल मराठमोळी, रांगडा बाज दिसून येणार आहे. जान्हवी पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. लग्न निर्विघ्नपणे पार पडणार आहे. पण, विभासचं खरं रूप तिच्यासमोर येईल का हे बघणे रंजक असणार आहे.

शुभमंगल ऑनलाईन मालिकेमध्ये शंतनू आणि शर्वरी अखेर लग्नबंधनामध्ये अडकणार आहेत. त्यांचा विवाह सोहळा आनंदात पार पडणार आहे. दोघांचे लग्न पारंपारिक पध्दतीने पार पडणार असून प्रत्येक विधिला साजेसा असा उखाणा देखील घेणार आहेत. सप्तपदी, मंगलाष्टक, सुनमुख, हिरव्या रंगाची साडी, हिरवा चुडा, मंगळसूत्र या लूकमध्ये शर्वरी खूप सुंदर दिसत आहे. आता खर्‍या अर्थाने शंतनूला शर्वरीची साता जन्मासाठी साथ मिळाली आहे. इतक्या दिवसांनंतर या दोघांच्या आयुष्यात आलेला आनंद असाच टिकून राहो अशीच ईच्छा त्यांच्या घरच्यांची असणार. हा ‘विवाह विशेष सप्ताह’ पाहता येईल ‘बायको अशी हव्वी’ आणि ‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकांत ज्या प्रसारित होतात अनुक्रमे रात्री ८.३० आणि रात्री १०.०० वा. कलर्स मराठीवर वाहिनीवर.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.