ग्वाल्हेर - बॉलिवूडचे लोकप्रिय गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी (Bappi Lahiri Death) यांनी १६ फेब्रुवारी रोजी या जगाचा निरोप घेतला. बप्पी लाहिरी यांचा मध्य प्रदेशातील डाकूंसाठी प्रसिद्ध असलेल्या चंबळ प्रदेशाशी ( Bappi Lahiri Chambal Connection ) खूप खोलवर संबंध होता.
बॉलिवूडचे लोकप्रिय गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचे बुधवारी १६ फेब्रुवारी रोजी वयाच्या ६९ व्या वर्षी आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण बॉलिवूड आणि देश शोकसागरात बुडाला आहे. बप्पी लाहिरी यांचे चंबळशी घट्ट नाते आहे. चंबळ हा प्रदेशात दरोडेखोरांची दहशत असते. बप्पी लाहिरी यांच्या मुलगी रीमा लाहिरीचे सासर चंबळमध्ये राहते. त्यांनी 2006 मध्ये मुरैना येथील जौरा शहरात राहणाऱ्या गोविंद बन्सल यांच्याशी लग्न केले. बप्पी लाहिरी यांच्या मुलीचे सासर चंबळमध्ये असून ते त्यांच्या मुलीच्या घरी यायचे. नुकतेच बप्पी लाहिरी चंबळला येऊन गेले होते.
लुटारूंच्या परिसरात मुलीचे लग्न
चंबळमध्ये दरोडेखोरांची दहशत असताना बप्पी लाहिरींनी मुलीचे लग्न केले. चंबळच्या दऱ्याखोऱ्यात अनेक दरोडेखोर सक्रिय होते. त्या काळात बप्पी लाहिरी यांनी आपली मुलगी रीमा हिचे लग्न थाटामाटात केले आणि ते आठवडाभर ग्वाल्हेर चंबल झोनमध्ये राहिले. त्यांचा जावई गोविंदचा मित्र सर्फराजने सांगितले की, 'जेव्हा बप्पी दा ग्वाल्हेरला यायचे. तेव्हा ते त्यांना पहिल्यांदा भेटले होते. त्यांचे व्यक्तीमत्व साध्या स्वभावाचे होते.'
मुलीची इच्छा पूर्ण झाली
बप्पी लाहिरी यांचे जावई गोविंद बन्सल यांचे संपूर्ण कुटुंब जौरा येथे राहते. मात्र, ते आणि रिमा बन्सल बप्पीदांसोबत मुंबईत राहत होते. गोविंद बन्सल यांनी मुंबईत बप्पी लाहिरी यांची भेट घेतली. तेव्हा गोविंद बप्पी लाहिरी यांची मुलगी रीमाच्या प्रेमात पडले. आणि त्यांनी नंतर लग्न केले. आपल्या मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी बप्पी लाहिरी यांनी 2006 मध्ये गोविंद बन्सल यांच्याशी लग्न केले. आणि बप्पी लाहिरी चंबळचे नाते जोडले. ऐशोआरामाचे जग सोडून त्यांनी चंबळच्या खोऱ्यात आपल्या मुलीचे लग्न लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. माझ्या मुलीचे तिच्या इच्छेनुसार होईल असे त्यांचे ठाम मत होते.
हेही वाचा - कभी अलविदा ना कहना... 'डिस्को' भारतीय संगीतात रुढ करणाऱ्या बप्पी लहरींना 'ईटीव्ही भारत'ची आदरांजली