अभिनेत्री अर्चना पूरण सिंग आज तिचा 60 वा वाढदिवस साजरा करीत आहे. टीव्हीच्या दुनियेतून बाहेर पडून बॉलीवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करणाऱ्या अर्चनाला आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. ती मुख्यतः चित्रपटांमधील तिच्या विनोदी भूमिकांसाठी व टीव्ही शोमधील जज म्हणून ओळखली जाते. आत्तापर्यंत अर्चना 100 हून अधिक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ती कपिल शर्मा शोमध्ये नवज्योत सिंग सिद्धूच्या जागी जज म्हणून काम पाहत आहे. द कपिल शर्मा शोमध्ये हसण्यासाठी अर्चना पूरण सिंग भरमसाठ मानधन घेत असते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्चना पूरण सिंह एका एपिसोडच्या शूटिंगसाठी सुमारे 10 लाख रुपये फी घेते. अर्चनाला सीटवर बसून हसण्यासाठी ही रक्कम मिळते. मुंबईतील मड आयलंडमध्ये अर्चनाचा स्वतःचा आलिशान बंगला आहे, ज्यामध्ये ती तिच्या संपूर्ण कुटुंबासह राहते. सध्या अर्चनाकडे जवळपास २०० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे सांगितले जाते.
अर्चना एक हुशार अभिनेत्री आहे तसेच ती टीव्ही शोमध्ये जजची भूमिका बजावते. अर्चना पहिल्यांदा टीव्ही शो कॉमेडी सर्कसमध्ये जजच्या भूमिकेत दिसली होती, त्यानंतर तिने या शोच्या सीझनला जज केले आहे. ती सध्या द कपिल शर्मा शोमध्ये जज म्हणून दिसत आहे.

अर्चनाने अभिषेक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याशिवाय तिने शोला और शबनम, मोहब्बतें, बोल बच्चन, कुछ कुछ होता है, कल किसने देखा, राजा हिंदुस्तानी, क्रिश, मस्ती, बडे दिलवाले, मैने दिल तुझको दिया, होगा तुफान, निकाह, आशिक आवारा, टक्कर, जानशीन यांसारखे चित्रपटही केले आहेत. मात्र, अर्चनाला 'कुछ कुछ होता है' या चित्रपटात मिस ब्रिगांझा म्हणून सर्वाधिक पसंती मिळाली होती.

अर्चना सिंहच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर तिने 30 जून 1992 रोजी परमीत सेठीसोबत लग्न केले. अर्चनाचे परमीतसोबतचे हे दुसरे लग्न होते. अर्चनी तिच्या पहिल्या लग्नात खूश नव्हती, त्यानंतर तिचा घटस्फोट झाला. परमीत आणि अर्चना काही काळ रिलेशनशिपमध्ये होते, त्यानंतर त्यांनी मध्यरात्री पळून जाऊन लग्न केले. एका मुलाखतीदरम्यान अर्चनाने सांगितले होते की, परमीतचे आई-वडील या लग्नाच्या विरोधात होते, त्यामुळे परमीतने लग्नाची गोष्ट 4 वर्षे घरच्यांपासून लपवून ठेवली होती.
हेही वाचा - देसी गर्ल लूकमध्ये प्री ऑस्कर सोहळ्यात पोहोचली प्रियांका चोप्रा