मुंबई - बॉलिवूडचा 'झक्कास' अभिनेता अनिल कपूरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अनिल कपूर आज आपली धाकटी मुलगी रिया कपूरचे हात पिवळे करणार आहे. अभिनेत्री सोनम कपूरची धाकटी बहीण रिया कपूर लग्न करत आहे. रिया आज तिचा बॉयफ्रेंड करण बूलानीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. हे लग्न सोनम कपूरच्या लग्नासारखे शाही असणार नाही. हा एक छोटेखानी खासगी कार्यक्रम असेल. एक वर्षानंतर सोनम कपूर लंडनहून मागील जुलै महिन्यात मुंबईत परतली होती.
इथे होणार लग्न
रिया कपूर तिचा बॉयफ्रेंड करण बूलानीसोबत मुंबईतील जुहू येथील बंगल्यात निवडक पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न करणार आहे. करण आणि रिया गेल्या 13 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. या लग्नात फक्त निवडक बॉलिवूड कलाकार दिसतील. लग्नाची सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
कोण आहे नवरदेव?
रिया कपूरचा बॉयफ्रेंड करण बूलानी हा चित्रपट दिग्दर्शक आहे. त्याने 'आयशा' आणि 'वेकअप सिड' सारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. या दोन्ही चित्रपटांची निर्मिती रिया हिने केली होती. या व्यतिरिक्त, करणने अनेक चित्रपटांसाठी निर्मिती, दिग्दर्शन आणि डबिंग देखील केले आहे. असे सांगितले जात आहे की करण आणि रिया 2010 च्या 'आयशा' चित्रपटात एकत्र काम करताना जवळ आले होते आणि तिथून दोघांमध्ये नवीन संबंध सुरु झाले.
सोशल मीडियावर व्यक्त केले प्रेम
विशेष म्हणजे, रिया आणि करण सोशल मीडियावर अनेक वेळा एकमेकांची काळजी घेताना आणि प्रेम व्यक्त करताना दिसले आहेत. दोघेही त्यांच्या चाहत्यांसोबत फोटो आणि कमेंट्सद्वारे संपर्कात राहण्याचा प्रयत्न करीत आले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
रिया कपूरबद्दल बोलायचे तर ती उत्तम निर्माती आहे. यासोबतच ती मोठी बहीण सोनम कपूर आहुजासोबत रेसन नावाच्या फॅशन ब्रँडचे काम देखील हाताळते. रिया प्रसिद्धीपासून दूर राहात असते.
हेही वाचा - कंगनाने परिधान केले पारदर्श ब्रालेट, ट्रोलर्सच्या टीकेला 'क्वीन'चे उत्तर