ETV Bharat / sitara

'अंग्रेजी मीडियम'च्या दिग्दर्शकापेक्षा डिंपल कपाडियाचं वरचढ, पाहा फोटो - hindi mediam

काही दिवसांपूर्वीच अंग्रेजी मीडियम या चित्रपटात डिंपल कपाडीया यादेखील भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यांची नेमकी भूमिका काय असणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, त्यांचा एक फोटो समोर आला आहे.

'अंग्रेजी मीडियम'च्या दिग्दर्शकापेक्षा डिंपल कपाडियाचं वरचढ, पाहा फोटो
author img

By

Published : Jul 5, 2019, 10:34 AM IST

मुंबई - 'हिंदी मीडियम' या चित्रपटाचा सिक्वेल असलेला 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकतादेखील आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता इरफान खान हा पुन्हा एकदा पडद्यावर झळकणार आहे. त्यामुळे त्याचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या सेटवरचे बरेचसे फोटो सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटात डिंपल कपाडीया यादेखील भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यांची नेमकी भूमिका काय असणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, त्यांचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये त्या दिग्दर्शकापेक्षाही वरचढ ठरलेल्या पाहायला मिळत आहेत. खुद्द चित्रपटाचे दिग्दर्शक होमी अदाजनीया यांनी हा फोटो शेअर केला आहे.

होमी यांनी शेअर केलेल्या या फोटोत डिंपल यांचा एकदम हटके लूक पाहायला मिळतो. बॉस स्टाईलमध्ये असलेल्या या फोटोत त्या दिग्दर्शकाच्या खांद्यावर पाय ठेवून आरामात उभ्या आहेत. यावर दिग्दर्शक होमी यांनी मजेदार कॅप्शनही दिले आहे.

'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटात इरफान खानसोबत करिना कपूर खानदेखील झळकणार आहे. तसेच राधिका मदन आणि डिंपल यांचीदेखील महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.