ETV Bharat / sitara

आयुष्मानचा 'हा' सुपरहिट चित्रपट तेलुगूमध्ये होणार रिमेक, हैदराबादमध्ये होणार लॉन्चिंग - अंधाधूनचा तेलुगू रिमेक

जून २०२० मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

Andhadhun telugu Remake launched in Hyderabad, Nitin play lead role
आयुष्मानचा 'हा' सुपरहिट चित्रपट तेलुगूमध्ये होणार रिमेक, हैदराबादमध्ये होणार लॉन्चिंग
author img

By

Published : Feb 24, 2020, 12:59 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना हा सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. गेल्या काही वर्षांपासून त्याने एकापाठोएक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. २०१८ साली त्याचा 'अंधाधून' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार व्यवसाय केला होता. आता या चित्रपटाचा तेलुगू भाषेत रिमेक होणार आहे. हैदराबाद येथे या चित्रपटाचा तेलुगू रिमेक लॉन्च करण्यात येणार आहे.

दाक्षिणात्य अभिनेता नितीन या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. अद्याप या चित्रपटाचे शिर्षक ठरलेले नाही. मेरलापाका गांधी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर, एन. सुधाकर रेड्डी आणि निकीता रेड्डी या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. जून २०२० मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

हेही वाचा -'कुली नंबर वन'च्या सेटवर सारा-वरुणचा रोमॅन्टिक अंदाज, शेअर केला फोटो

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या रिमेकबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे. तसेच या चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचे फोटो देखील पोस्ट केले आहेत.

'अंधाधून' चित्रपटातील भूमिकेसाठी आयुष्मानला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केले आहे. या चित्रपटात आयुष्मानसोबत राधिका आपटे आणि तब्बू यांचीदेखील मुख्य भूमिका पाहायला मिळाली होती.

हेही वाचा -जयललितांच्या भूमिकेमध्ये कंगनाचा नवा 'थलायवी' लुक, जयंतीनिमित्त शेअर केला फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.