भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बी आर आंबेडकर यांची १३०वी जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्याचे ठरले होते. परंतु कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आणि लॉकडाऊनसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे घरीच बसून साधेपणानेच ही जयंती साजरी करावी लागणार आहे. हिंदी वाहिनी एण्ड टीव्हीच्या कलाकारांनी बाबासाहेबांना विशेष मानवंदना देत संघटित भारताप्रती त्यांच्या दृष्टिकोनाला प्रशंसित केले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित हिंदी मालिका ‘एक महानायक डॉ. बी. आर. आंबेडकर’ एण्ड टीव्ही वर प्रसारित होते.
जगन्नाथ निवंगुणे (मालिका 'एक महानायक डॉ. बी. आर. आंबेडकर’ मधील रामजी सकपाळ), अंबरिश बॉबी (मालिका 'और भई क्या चल रहा है?' मधील रमेश प्रसाद मिश्रा), पवन सिंग (मालिका 'और भई क्या चल रहा है' मधील जफर अली मिर्झा), आकांक्षा शर्मा (मालिका 'और भई क्या चल रहा है' मधील सकिना), फरहाना फतेमा (मालिका 'और भई क्या चल रहा है' मधील शांती), आसिफ शेख (मालिका 'भाबीजी घर पर है' मधील विभुती नारायण मिश्रा), रोहिताश्व गौड (मालिका 'भाबीजी घर पर है' मधील मनमोहन तिवारी), कामना पाठक (मालिका 'हप्पू की उलटन पलटन' मधील राजेश), ग्रेसी सिंग (मालिका 'संतोषी माँ सुनाएं व्रत कथाएं' मधील संतोषी माँ) या कलाकारांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली वाहिली आहे.
दूरियों का दौर, मिटाया है जिसने, मजबूरियों का अंधेरा, हटाया है जिसने,
आस्मान तक अग्नीकुंड में, जलते हुए, अपनी कलम से देश को संवारा है जिसने,
१३० करोड देशवासीयों का डॉ. बी. आर. आंबेडकर की १३०वी जयंती पर शत शत नमन
ग्रेसी सिंग ऊर्फ संतोषी माँ म्हणाल्या, ''बाबासाहेब हे भारतीय इतिहासामधील सर्वात महान नेत्यांपैकी एक आहेत. समानता, महिला सक्षमीकरणासाठी त्यांचा संघर्ष असो किंवा शिक्षणामधील त्यांचा सहभाग असो, त्यांचा प्रत्येक भारतीयाच्या जीवनावर प्रभाव पडलेला आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त आपला देश व आपल्या समाजाप्रती त्यांच्या प्रचंड योगदानाचे स्मरण व सन्मानित करूया.''
जगन्नाथ निवंगुणे ऊर्फ रामजी सकपाळ म्हणाले, ''डॉ. आंबेडकर हे सर्वोत्तम नेता होते. त्यांनी केलेल्या कार्याचा सर्व भारतीयांच्या जीवनावर आमूलाग्र परिणाम झाला आहे. आपण बाबासाहेब यांची १३०वी जयंती साजरी करत असताना या महान नेत्याला आणि समाजाप्रती त्यांच्या प्रचंड योगदानाला आमचा सलाम!''
रोहिताश्व गौड ऊर्फ मनमोहन तिवारी म्हणाले, ''डॉ. बी. आर. आंबेडकर हे दूरदर्शी नेते होते. त्यांचे विविध सामाजिक व आर्थिक सुधारणांच्या माध्यमातून आपल्या देशाला संघटित करण्याचे स्वप्न होते आणि हेच स्वप्न त्यांनी भारतीय संविधान रचत साकारले. आंबेडकर जयंतीनिमित्त मी सर्व नागरिकांना एकत्र येऊन महान नेते व सामाजिक सुधारक – डॉ. बी. आर. आंबेडकर यांचे स्मरण करत त्यांना मानवंदना देण्याचे आवाहन करतो.''
अंबरिश बॉबी ऊर्फ रमेश प्रसाद मिश्रा म्हणाले, ''डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी लाखो भारतीयांना एक देश व एक संविधान अंतर्गत एकत्र आणत संघटित भारताचा पाया रचला. त्यांची शिकवण व तत्त्व आजही देशभरातील भारतीयांशी संलग्न आहेत.''
हेही वाचा - टीम ‘सरसेनापती हंबीरराव' तर्फे मोफत रुग्णवाहिकेचे अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण!
फरहाना फतेमा ऊर्फ शांती मिश्रा म्हणाल्या, ''यंदाची आंबेडकर जयंती ही या महान नेत्याची १३०वी जयंती आहे. बाबासाहेबांनी महिला व समाजासाठी प्रचंड कार्य केले आहे. ते अनेकांसाठी प्रेरणास्रोत आहेत. त्यांनी त्यांच्या शिक्षणाचा वापर करून आमूलाग्र बदल घडवून आणला. त्यांची कामगिरी व योगदान आपल्यासाठी, तसेच भावी पिढीसाठी प्रेरणादायी आहे.''
पवन सिंग ऊर्फ जफर अली मिर्झा म्हणाले, ''डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी अधिक उदारमतवादी भविष्यासह समाजाला मार्ग दाखवला, जेथे समानता हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. त्यांचा उत्तम दृष्टिकोन व विश्वास होता, ज्यामुळे सामाजिक व आर्थिक बदल घडून आले, ज्याचा अनेक जीवनांवर आमूलाग्र परिणाम झाला. बाबासाहेबांनी केलेल्या कामगिरीनुसार फक्त काहीच नेते देशाला संघटित करू शकले.''
आकांक्षा शर्मा ऊर्फ सकिना मिर्झा म्हणाल्या, ''बाबासाहेब हे दूरदर्शी नेते होते. आज आपल्या देशाने केलेल्या प्रगतीत मोठे श्रेय त्यांना जाते. त्यांनी लोकांना संघटित करण्यासोबत त्यांना सर्व प्रकारच्या दडपशाहीविरोधात एकजुटीने आवाज उठवण्यास प्रेरित केले.''
आसिफ शेख ऊर्फ विभुती नारायण मिश्रा म्हणाले, ''मी डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या जीवनकथा ऐकत मोठा झालो आहे आणि समानतेसाठी त्यांच्या संघर्षाचा माझ्यावर मोठा प्रभाव पडला आहे. डॉ. आंबेडकर हे आधुनिक भारतातील समानतेचे सर्वात प्रबळ समर्थक राहिले आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना स्मरण करूया आणि त्यांचे कार्य व दृष्टिकोनाला प्रशंसित करूया.''
कामना पाठक ऊर्फ राजेश म्हणाल्या, ''डॉ. आंबेडकर यांनी आपल्या समाजाकडे उदारमतवादीपणे व समानतेने पाहिले. अनेकांच्या जीवनावर प्रभाव पाडलेले सामाजिक व आर्थिक बदल घडवून आणण्यासाठी मोठ्या विचारसरणीची गरज लागते. बाबासाहेबांनी केलेल्या कामगिरीनुसार इतर काहीच नेते देशाला संघटित करू शकले. चला आपण एकत्र मिळून या महान नेत्याला मानवंदना देऊया. भीमासारखे बनण्यासाठी हिंमत पाहिजे आणि देशाप्रती देशभक्ती व अमाप प्रेम पाहिजे.''
या आंबेडकर जयंती सप्ताहामध्ये महान नेते डॉ. बी. आर. आंबेडकर यांचा सन्मान, स्मरण व प्रशंसित करीत या सर्व कलाकारांनी १३० कोटी देशवासीयांच्या वतीने शत शत नमन करीत त्यांना अभिवादन केले आहे.
हेही वाचा - कोरोना उद्रेकामुळे कंगना रानौत अभिनित ‘थलायवी’चे सुद्धा प्रदर्शन ढकलले पुढे!