अमिताभ यांच्या कौन बनेगा करोडपती क्विझ शोच्या 1000 व्या भागाच्या निमित्ताने श्वेता आणि नव्या नवेली यांना 'कौन बनेगा करोडपती'च्या सेटवर आमंत्रित करण्यात आले होते. गुरुवारी, बिग बी यांनी इंस्टाग्रामवर शूटमधील श्वेता आणि नव्यासोबतचा त्यांचा एक सुंदर फोटो शेअर केला. "मुली सर्वोत्तम असतात," असे कॅप्शन त्यांनी पोस्टला दिले आहे.
या तिघांच्या फोटोने नेटिझन्सनी त्यांच्या अनमोल बंधाबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. "अरे व्वा," अशी प्रतिक्रिया अभिनेता रणवीर सिंगने व्यक्त केली आहे. मौनी रॉय आणि अपारशक्ती खुराणा यांनी पोस्टवर हृदयाच्या इमोजीची एक स्ट्रिंग टाकली. बिग बी यांनी त्यांच्या ब्लॉगवर शूटमधील काही फोटो देखील शेअर केले आणि त्यांच्या ब्लॉगवर एक मनापासून नोट लिहिली.
-
T 4106 -
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 24, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
बेटियाँ सब से प्यारी ; उनका ही जहां है pic.twitter.com/v0MhXFrJzG
">T 4106 -
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 24, 2021
बेटियाँ सब से प्यारी ; उनका ही जहां है pic.twitter.com/v0MhXFrJzGT 4106 -
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 24, 2021
बेटियाँ सब से प्यारी ; उनका ही जहां है pic.twitter.com/v0MhXFrJzG
"वडील आणि आजोबांसाठी खूप अभिमानाची संध्याकाळ'', असे बच्चन यांनी सुरुवातीला लिहिलंय. केबीसीचा 1000 वा भाग पूर्ण झाल्याचा आनंद त्यांनी यातून व्यक्त केलाय. 2000 मध्ये सुरू झालेला बच्चन यांचा प्रवास तेव्हापासून सुरू झाला तो 1000 व्या भागापर्यंत पोहोचलाय. 2006 मध्ये त्यांची जागा शाहरुखने घेतली होती परंतु प्रेक्षकांनी आपल्या मनात बच्चन यांनाच स्थान दिले होते. त्यानंतर प्रत्येत सिझनमध्ये अमिताभच या शोचा चेहरा बनले आहेत.
हेही वाचा - '83' चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा संपली, रणवीर सिंह करणार ट्रेलर लॉन्च