ETV Bharat / sitara

कंगनाच्या 'त्या' टीकेवर काय म्हणाली आलिया? - kalank

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या वादग्रस्त टीकेसाठी आणि परखड मतांसाठी ओळखली जाते. काही दिवसांपूर्वीच तिने रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्यावर निशाणा साधत बेजबाबदार असल्याचे वक्तव्य केले होते.

कंगना रनौत
author img

By

Published : Mar 7, 2019, 8:43 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या वादग्रस्त टीकेसाठी आणि परखड मतांसाठी ओळखली जाते. काही दिवसांपूर्वीच तिने रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्यावर निशाणा साधत बेजबाबदार असल्याचे वक्तव्य केले होते. बॉलिवूडचे हे कलाकार राजकारणावर आपले मत मांडण्यास का कचरतात, अशी टीका तिने केली होती. तिच्या या टीकेवर आलियाला प्रश्न विचारण्यात आला होता.

एका कार्यक्रमादरम्यान आलियाने कंगनाच्या या टीकेवर समंजस उत्तर दिले आहे. ती म्हणाली, की 'कंगना जे काही बोलली तिच्यासारखं कदाचित मला माझी मतं मांडता येत नाहीत. मात्र, माझी मतं ही माझ्यापुरतीच सिमीत आहेत. माझे वडील मला नेहमी म्हणतात, की जगात अनेक लोक त्याची मतं मांडत असतात, मग दरवेळी त्यात आपलेही मत असावे, हे गरजेचं नाही. कंगनाच्या मतांचा मी आदर करते. ती तिचे मत परखडपणे मांडते, त्याचाही सन्मान करते', असे ती यावेळी म्हणाली.

पुढे आलियाने कंगनाचे कौतुकही केले. कंगना तिच्या अभिनयाप्रमाणेच तिची मतही स्पष्टपणे मांडू शकते, असेही ती म्हणाली. आलियाच्या या समंजस उत्तराचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. अनेकांनी तिच्या हजरजबाबीपणाचीही प्रशंसा केली आहे.

undefined
आलियाचा अलिकडेच 'गली बॉय' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही दमदार गल्ला जमवला आहे. लवकरच ती रणबीर कपूरसोबत 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात झळकणार आहे. त्यानंतर ती 'कलंक' चित्रपटातही वरूण धवनसोबत भूमिका साकारणार आहे. दोन्ही चित्रपटांचे लोगो प्रदर्शित झाले आहेत. आता या चित्रपटांचे ट्रेलरही काही दिवसांत प्रदर्शित होतील

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.