मुंबई - ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रेक्षकांची लाडकी झालेली अभिनेत्री म्हणजे अक्षय देवधर. त्या मालिकेतील पाठक बाई या गोड व्यक्तिरेखेला प्रेक्षक अजूनही विसरू शकले नाही आहेत. ही भूमिका निभावणारी अभिनेत्री अक्षया देवधर प्रेक्षकांची आवडती कलाकार आहे आणि त्यांची लाडकी अक्षया ‘हे तर काहीच नाय’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या कार्यक्रमात नामांकित सेलिब्रिटीज रोचक किस्से सादर करतात. अक्षया या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करीत असून हा तिचा पहिलाच प्रयत्न आहे. प्रेक्षक आपल्या ‘पाठक बाईंना’ सपोर्ट करताना दिसताहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
डेलीसोप केल्यानंतर कथाबाह्य कार्यक्रम करतानाच अनुभव खूप वेगळा आहे असं अक्षया म्हणते. त्याबद्दल सांगताना ती म्हणाली, "मी या आधी कॉलेजमध्ये सुद्धा कार्यक्रमांसाठी अँकरिंग केलं आहे त्यामुळे अगदीच पहिला अनुभव आहे असं नाही म्हणता येणार. ‘हे तर काहीच नाय’ हा कार्यक्रम सुद्धा माझ्यासाठी एक वेगळी संधी घेऊन आला आणि मला अगदी योग्यवेळी मिळाला असं मी म्हणेन. खूप वर्ष डेलीसोप केल्यानंतर आता कथाबाह्य कार्यक्रम करतानाचा अनुभव खूप वेगळा आहे असं मी म्हणेन.”
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अक्षय देवधर पुढे म्हणाली, “सगळ्या मोठा बदल म्हणजे रोज शूटिंग करण्यापासून ते आठवड्यातून २ दिवस शूटिंग करणे. तसंच सूत्रसंचालन करत असताना लाईव्ह ऑडियन्सच्या रिऍक्शनवरून आपल्याला ऑन द स्पॉट इम्प्रोवाईज करायचं असतं. आपल्या सूत्रसंचालनातून प्रेक्षकांना कार्यक्रमाशी जोडून ठेवायचं असतं. हे खूप आव्हानात्मक आहे पण मी सिद्धू दादा आणि निलेश यांच्याकडून जितकं शिकता येईल तेवढं शिकायचा प्रयत्न करतेय."
‘हे तर काहीच नाय’ हा कार्यक्रम झी मराठी वर प्रदर्शित होतो.
हेही वाचा - Vicky Kaushal Enjoy Cricket : जेव्हा सिनेमाच्या सेटवर क्रिकेटसाठी विकी कौशल 'वेळ काढतो' पाहा व्हिडिओ