मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा आज वाढदिवस आहे. कलाविश्वासोबतच चाहत्यांनीही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. या खास दिवशी अजय देवगननेही तिचा एक फोटो शेअर करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अजयने काजोलचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्याने लिहिलेय, 'वेक अप! तुला ब्यूटी स्लिपची अजुनतरी काहीच गरज नाही'.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
काजोल नेहमी तिच्या मस्तीखोर स्वभावासाठी ओळखली जाते. १९९९ साली तिने अजयसोबत लग्नगाठ बांधली होती. दोघांनीही 'इश्क', 'प्यार तो होना ही था' आणि 'दिल क्या करे' यांसारख्या चित्रपटात एकत्र भूमिका साकारली होती.