ETV Bharat / sitara

सिटी ऑफ ड्रीम्स:महेश आरवलेची व्यक्तिरेखा प्रेक्षकांसाठी एक गुपित होते - आदिनाथ कोठारे - आदिनाथ कोठारेचे आगामी चित्रपट

सिटी ऑफ ड्रीम्स या वेब सिरीजमध्ये महेश आरवले ही व्यक्तिरेखा आदिनाथ कोठारे याने साकारली असून त्याच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक होत आहे. या मालिकेतील महेश आरवलेची व्यक्तिरेखा प्रेक्षकांसाठी एक गुपित होते, असे आदिनाथने म्हटले आहे.

Adinath Kothare
आदिनाथ कोठारे
author img

By

Published : Aug 5, 2021, 5:27 PM IST

डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरील वेब सिरीजना चांगले दिवस आले आहेत. या प्लॅटफॉर्मची खासियत म्हणजे यातील कथानक हिरो असते आणि स्टार्सना अवाजवी भाव दिला जात नाही. प्रत्येक भूमिकेला पोषक अशा कलाकारांची निवड केली जाते. मराठी कलाकार उत्तम अभिनयासाठी जाणले जातात आणि अनेक वेब सिरीजमधून मराठी कलाकार मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत. नुकताच एका हिंदी वेब सिरीजचा दुसरा सिझन प्रदर्शित झाला ज्यात अनेक मराठी कलाकारांचा भरणा आहे.

Adinath Kothare
आदिनाथ कोठारे

'सिटी ऑफ ड्रीम्सचा' पहिला सिझन प्रचंड गाजला होता. प्रेक्षकांच्या आग्रहाखातर त्याचा दुसरा सिझन आला. यात प्रिया बापट, सचिन पिळगावकर, अतुल कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर सारखे अनेक मराठी कलाकार प्रमुख भूमिकांत आहेत. दुसरा सीझनही आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या सिरीजमध्ये एक सरप्राईज एन्ट्री झालीय. सध्या एका व्यक्तिरेखेची जोरदार चर्चा आहे ती म्हणजे महेश आरवलेची. ही व्यक्तिरेखा आदिनाथ कोठारे याने साकारली असून त्याच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक होत आहे. 'सिटी ऑफ ड्रीम्स'च्या कोणत्याही पोस्टर, टिझर किंवा ट्रेलरमधून ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर आणली गेली नव्हती. ती व्यक्तिरेखा प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज होते. त्याची ही सामाजिक नेत्याची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप भावत असून सोशल मिडीयावर प्रेक्षकांसह सिनेसृष्टीतूनही त्याच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Adinath Kothare
आदिनाथ कोठारे

आदिनाथ कोठारे आपल्या 'सिटी ऑफ ड्रीम्स' मधील व्यक्तिरेखेविषयी म्हणतो, ''अनेकांचे अभिनंदनाचे फोन, मेसेजेस येत असून सोशल मिडीयावर त्याचे कौतुक होत आहे. प्रेक्षकांच्या आणि सगळ्यांच्या या प्रेमाबद्दल मी खूप आभारी आहे. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळे एक प्रकारची ऊर्जा मिळते तसेच अजून उत्तम काम करण्याचा हुरूप येतो. सिटी ऑफ ड्रीम्समधील महेश आरवलेची व्यक्तिरेखा प्रेक्षकांसाठी एक गुपित होते. हे गुपित प्रेक्षकांना आवडत आहे याचा आनंद नक्कीच आहे.''

Adinath Kothare
सिटी ऑफ ड्रीम्स या वेब सिरीजमध्ये आदिनाथ कोठारे

आदिनाथ कोठारे ‘८३’, ‘पाणी’, ‘पंचक’ यांसारख्या आगामी चित्रपटांमधून दिसणार आहे. '८३' हा १९८३ च्या वर्ल्डकपवर आधारित चित्रपट आहे. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंग, दिपीका पदुकोण यांचासोबत आदिनाथही झळकणार आहे. माधुरी दीक्षितची निर्मिती असलेल्या 'पंचक' या चित्रपटातही आदिनाथ कोठारे दिसणार असून माधुरी सोबतचा त्याचा हा दुसरा चित्रपट आहे.

आदिनाथ कोठारे दिग्दर्शित 'पाणी' या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत तसेच हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे.

हेही वाचा - उमेश कामत म्हणतो, ‘प्रत्येक कपलने एकमेकांसाठी वेळ काढलाच पाहिजे’!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.