ETV Bharat / sitara

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त पोस्ट केल्याने 'ही' अभिनेत्री अडचणीत, नेटिझन्सनी दिला कडवट ट्विट्सचा प्रसाद - social media

काहीदिवसांपूर्वीच पायल रोहतगी तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली होती. 'स्वतंत्र्य भारताचा पहिला दहशतवादी नथुराम गोडसे नसून पाकिस्तानची निर्मिती केलेले मोहम्मद अली जिना असल्याचं ट्विट तिने केले होते'. या ट्विटनंतर काही युजर्सनी तिचे कौतुक केले. मात्र आता शिवाजी महारांजावर केलेल्या पोस्टनंतर सोशल मीडियावर तिच्यावर टीकासत्र सुरू असल्याचे पाहायला मिळते.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त पोस्ट केल्याने 'ही' अभिनेत्री अडचणीत
author img

By

Published : Jun 3, 2019, 12:57 PM IST

Updated : Jun 3, 2019, 3:39 PM IST

मुंबई - सोशल मीडियावर बॉलिवूडचे अनेक कलाकार आपली मते मांडताना दिसतात. त्यांनी मांडलेली मते कधी वाद ओढवून घेतात तर कधी कौतुकास पात्र ठरतात. बऱ्याच वेळा काहींना ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागते. आपल्या अशाच एका पोस्टमुळे बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी अडचणीत आली आहे. तिने सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महारांजाबद्दल वादग्रस्त पोस्ट केली आहे. तिच्या या पोस्टनंतर नेटकऱयांनी तिला धारेवर धरले आहे.

काहीदिवसांपूर्वीच पायल रोहतगी तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली होती. 'स्वतंत्र्य भारताचा पहिला दहशतवादी नथुराम गोडसे नसून पाकिस्तानची निर्मिती केलेले मोहम्मद अली जिना असल्याचं ट्विट तिने केले होते'. या ट्विटनंतर काही युजर्सनी तिचे कौतुक केले. मात्र आता शिवाजी महारांजावर केलेल्या पोस्टनंतर सोशल मीडियावर तिच्यावर जोरदार टीका करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे.

PAYAL ROHATGI & Team -BHAKTS of BHAGWAN RAMVerified account या ट्विटर अकाऊंटवर तिने वादग्रस्त ट्विट शेअर केली आहे. प्रसिद्धीचा हव्यासापोटी तिने ही ट्विट केल्याचे सांगितले जात आहे. तिच्या या ट्विटवर युजर्सनी जोरदार प्रहार केला आहे.

पायलने तिच्या पोस्टमध्ये शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह असे विधान केले आहे. मराठा आरक्षणाबाबतही तिने लिहिलेय, की महाराष्ट्रात मराठ्यांना मराठा आरक्षण का दिले गेले, असा प्रश्न तिने विचारला आहे. या पोस्टसोबत तिने तिच्या पतीसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jun 3, 2019, 3:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.