मुंबई - कॉमेडियन वीर दास या दिवसांत त्याच्या कॉमेडीमुळे नाही, एका वादग्रस्त विधानामुळे भलताच चर्चेत आला आहे. सर्व बाजूने त्याला टीकेचा सामना करावा लागत आहे. मात्र सर्वजण त्याला विरोध करत असतांना अभिनेत्री काम्या पंजाबी त्याच्या समर्थनार्थ पुढे आली आहे. अलीकडेच वीर दासने अमेरिकेत भारतविरोधी वक्तव्य केल्यानंतर तो वादात सापडला. त्याच्या या वक्तव्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी त्याच्याविरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत. अशा परिस्थितीत आता अभिनेत्री काम्या पंजाबीने वीर दासच्या समर्थनार्थ आपले मत मांडले आहे.
काम्याने वीर दासच्या विधानाचे समर्थन केले आणि म्हणाली, "मी सहमत आहे की, भारताच्या दोन बाजू आहेत. त्यातला एक पैलू असा आहे की आपल्याला त्याचा एवढा अभिमान आहे की आपण त्यासाठी मरायलाही तयार आहोत. त्याच वेळी, एक पैलू असा आहे ज्यासाठी आपण आशा करतो आणि कठोर परिश्रम करतो की त्यात काही बदल व्हावेत, मग त्यात चुकीचे काय आहे?''
काही दिवसांपूर्वी जॉन एफ केनेडी सेंटरमध्ये झालेल्या एका शोमध्ये, वीर दासने देशाच्या दोन बाजूंबद्दल सांगितले होते. तो म्हणाला होता, “की मी अशा भारतातून आलो आहे जिथे आम्ही दिवसा महिलांची पूजा करतो आणि रात्री त्यांच्यावर अत्याचार करतो.” काम्या पंजाबीबद्दल सांगायचे झाले, तर तिने अभिनयानंतर अलीकडेच राजकारणात प्रवेश केला आहे. गेल्या महिन्यातच तिने काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
हे ही वाचा - Rakhi Samvat's reaction :पाहा, कृषी कायदे मागे घेतल्यानंतर राखी सांवतची उत्स्फुर्त प्रतिक्रिया