ETV Bharat / sitara

अभिनयाच्या वेडापायी 'त्याने' सरकारी नोकरीवर सोडलं पाणी!

author img

By

Published : Jan 28, 2020, 2:03 PM IST

संचितने सायकॉलॉजीमध्ये एम. ए केल्यानंतर दोन वर्ष प्राध्यापक म्हणून सरकारी महाविद्यालयात नोकरी केली. संचितला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. टीव्हीवरचे कॉमेडी शो पाहून तो स्क्रीप्ट लिहायचा आणि शाळेत परफॉर्म करायचा.

Sanchit Chaudhari
अभिनेता संचित चौधरी

मुंबई - स्टार प्रवाहवर सुरू झालेल्या ‘प्रेमाचा गेम सेम टू सेम’ या मालिकेत दिघा आणि डॉ. अरविंद अशी दुहेरी भूमिका साकारणाऱ्या संचित चौधरीचा अभिनयाचा प्रवास खरोखर थक्क करणारा आहे. संचित मूळचा नागपूरचा. वडील शिक्षक असल्यामुळे संचितनेही शिक्षक व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, अभिनय क्षेत्राची आवड असलेल्या संचितला नोकरीत काहीच रस नव्हता. खिसे भरत होते, मात्र मन भरत नव्हते. त्यामुळे सरकारी नोकरी सोडून त्याने पूर्णपणे अभिनय करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा - ...अन् 'या' कारणामुळे दिया मिर्झाला कार्यक्रमात अश्रू अनावर, पाहा व्हिडिओ

संचितने सायकॉलॉजीमध्ये एम. ए केल्यानंतर दोन वर्ष प्राध्यापक म्हणून सरकारी शाळेत नोकरी केली. संचितला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. टीव्हीवरचे कॉमेडी शो पाहून तो स्क्रीप्ट लिहायचा आणि शाळेत परफॉर्म करायचा. दहावीनंतर मात्र त्याला काही स्पर्धांविषयी कळले. मग त्याने नागपूरचा 'रंगरसिया' हा थिएटर ग्रुप जॉईन केला. त्यानंतर राज्यनाट्य, पुरुषोत्तम करंडक, प्रबोधन करंडक, सवाई, लोकांकिका या नाट्यस्पर्धांमध्ये भाग घेत घेत तो मुंबईत पोहोचला. मुंबईत पृथ्वी थिएटरमध्ये त्याने बरेच प्ले सादर केले. बरेच वर्कशॉप्सही तो घेत होता. हिंदी आणि मराठीसाठी डबिंग आर्टिस्ट म्हणूनही त्याने काम केले.

हेही वाचा - 'गुल मकाई'च्या दिग्दर्शकानी उलगडला मलाला युसुफजाईचा प्रवास

नोकरी करता करता हे सर्व सुरू होते. नोकरी सोडून पूर्णपणे अभिनय करण्याच्या निर्णयाला सुरुवातीला घरातून विरोध झाला. मात्र हट्टापायी वडिलांनी संचितला तीन वर्षांची मुदत दिली. 'या तीन वर्षात अभिनयात तू स्वत:ला सिद्ध केलेस तरच आम्ही तुला पाठिंबा देऊ' अशी अट त्यांनी घातली. संचितच्या नशिबाने आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्याला स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाचा गेम सेम टू सेम’ मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या संधीमुळे संचित आणि त्याचे कुटुंबीयही आनंदी आहेत. अभिनयात वाहून घेण्याच्या संचितच्या निर्णयाबाबत आता त्याच्या कुटुंबीयांना कुठलीही तक्रार नाही.

हेही वाचा - 'कुछ तो लोग कहेंगे'... अदनान सामींचं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर

संचितचे अभिनयावरील हेच प्रेम त्याच्या ‘प्रेमाचा गेम सेम टू सेम’ मालिकेतही पाहायला मिळते. यामुळेच दिघा आणि अरविंद या दोन वेगळ्या व्यक्तिरेखा तो अगदी खुबीने रंगवू शकतो आहे.

Intro:‘प्रेमाचा गेम सेम टू सेम’ मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या संचित चौधरीचा प्रेरणादायी प्रवास

स्टार प्रवाहवर सुरु झालेल्या ‘प्रेमाचा गेम सेम टू सेम’ या मालिकेत दिघा आणि डॉ. अरविंद अशी दुहेरी भूमिका साकारणाऱ्या संचित चौधरीचा अभिनयाचा प्रवास खरोखर थक्क करणारा आहे. संचित मुळचा नागपूरचा. वडिल शिक्षक असल्यामुळे संचितनेही शिक्षक व्हावं अशी त्यांची इच्छा होती. संचितने सायकॉलॉजीमध्ये एम ए केलं आणि दोन वर्ष प्रोफेसर म्हणून सरकारी शाळेत नोकरीही केली. संचितला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. टीव्हीवरचे कॉमेडी शोज पाहून तो स्क्रीप्ट लिहायचा आणि शाळेत परफॉर्म करायचा. दहावीनंतर मात्र त्याला काही स्पर्धांविषयी कळलं. मग त्याने नागपूरातला रंगरसिया थिएटर ग्रुप जॉईन केला. त्यानंतर राज्यनाट्य, पुरुषोत्तम करंडक, प्रबोधन करंडक, सवाई, लोकांकिका या नाट्यस्पर्धांमध्ये भाग घेत घेत तो मुंबईत पोहोचला. मुंबईत पृथ्वी थिएटरमध्ये त्याने बरेच प्ले सादर केले. बरेच वर्कशॉप्सही तो घेत होतो. हिंदी आणि मराठीसाठी डबिंग आर्टिस्ट म्हणूनही त्याने काम केलं. नोकरी करता करता हे सर्व चालू होतं. अभिनय क्षेत्राची आवड असलेल्या संचितला नोकरीत काहीच रस नव्हता. खिसे भरत होते मात्र मन भरत नव्हतं. त्यामुळे सरकारी नोकरी सोडून त्याने पूर्णपणे अभिनय करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला घरातून विरोध झाला मात्र त्याच्या हट्टापायी वडिलांनी तीन वर्षांची मुदत दिली. या तीन वर्षात अभिनयात तू स्वत:ला सिद्ध केलंस तरच आम्ही तुला पाठिंबा देऊ अशी अट त्यांनी घातली. संचितच्या नशिबाने आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्याला स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाचा गेम सेम टू सेम’ मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या संधीमुळे संचित आणि त्याचे कुटुंबियही खूष झाले. त्यामुळे आता संचितच्या या निर्णयावर त्याचे घरचेही खूष आहेत. संचितचा हा प्रवास खरोखर स्वप्नवत आहे. आवड आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतीही गोष्ट साध्य करता येते असं संचितला वाटतं.

संचितचं अभिनयावरचं हेच प्रेम त्याच्या ‘प्रेमाचा गेम सेम टू सेम’ मालिकेतही पाहायला मिळतं आणि म्हणूनच दिघा आणि अरविंद या दोन वेगळ्या व्यक्तिरेखा तो अगदी खुबीने रंगवू शकतो. तेव्हा मनोरंजनाने परिपूर्ण अशी ‘प्रेमाचा गेम सेम टू सेम’ ही मालिका न चुकता पाहा दररोज रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
 
 Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.