ETV Bharat / sitara

अभिनेता रोमिल चौधरीचा, सामान्य मुलगा ते बिग बॉस स्पर्धक ते सेलिब्रिटी पर्यंतचा प्रवास!

author img

By

Published : Feb 17, 2021, 3:28 PM IST

रोमिल चौधरी हरयाणाच्या कर्नालमध्ये राहणार सामान्य मुलगा. सामान्य म्हणजे प्रसिद्धीचे वलय नसलेला. २०१८ मध्ये त्याची ‘बिग बॉस १२’ मध्ये ‘कॉमनर’ स्पर्धक म्हणून निवड झाली. तो या शोच्या ‘टॉप ५’ पर्यंत पोहोचला होता. आता तो अभिनेता तर झालायच पण एक सेलेब्रिटी म्हणूनही ओळखला जातो.

Romil Chowdhury
रोमिल चौधरी

पूर्वी मनोरंजनसृष्टीत दाखल व्हायचे म्हणजे कठीण काम होते. आताही आहे परंतु आता तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे थोडेफार सोपे झाले आहे. काही वर्षांपूर्वीपासून आपल्याकडे रियालिटी शोजची लोकप्रियता वाढू लागली आणि अनेक रियालिटी शोज मधून अनेकाधिक टॅलेंटेड मुलं-मुली मनोरंजनसृष्टीचे दार ठोठावू लागल्या. त्यातील अनेकांना संधीदेखील मिळाली व बऱ्याच जणांना सेलिब्रिटी स्टेटस पण प्राप्त झाले. त्यातील एक उदाहरण म्हणजे अभिनेता रोमिल चौधरी.

Romil Chowdhury
रोमिल चौधरी

कर्नालमध्ये राहणार सामान्य मुलगा रोमिल चौधरी
रोमिल चौधरी हरयाणाच्या कर्नालमध्ये राहणार सामान्य मुलगा. सामान्य म्हणजे प्रसिद्धीचे वलय नसलेला. भारतातील अनेक तरुणांच्या मनात असलेल्या ‘स्टार’ बनण्याच्या इच्छेने त्याला मुंबईत आणले. २०१८ मध्ये त्याची ‘बिग बॉस १२’ मध्ये ‘कॉमनर’ स्पर्धक म्हणून निवड झाली. तो या शोच्या ‘टॉप ५’ पर्यंत पोहोचला होता व बाहेर पडल्या पडल्या त्याला टीव्ही सिरीयल, कहाँ हम कहाँ तुम’, मध्ये महत्वपूर्ण रोल मिळाला. त्यानंतर रोमिलने मागे वळून पहिले नाही. आता तो २०२१ मध्ये चित्रपट करतोय व वेब सिरीज सुद्धा. एका सामान्य मुलाचा सेलिब्रिटी पदापर्यंतचा प्रवास अनेकांना प्रेरणादायी वाटतो.
अल्बममध्ये झळकला रोमिल चौधरी
नुकतेच त्याने ‘बेचैनीया’ या म्युझिक अल्बम केला ज्यात त्याची नायिका होती ऑस्ट्रेलिया स्थित भारतीय मॉडेल ईशानी मेहता. सिडनी आणि मुंबईत शूट झालेल्या या म्युझिक व्हिडीओ चे संगीत दिग्दर्शन केलंय आयन अली अब्बास आणि गीतलेखनही त्यांचेच आहे. डॉ. रीना मेहता व बॉलिवूडमधील पार्श्वगायक अमित मिश्रा यांनी ते गायलं असून व्हिडीओ-दिग्दर्शन आहे सुनील अगरवाल यांचे, जे ‘दबंग ३’ चे असोसिएट डिरेक्टर होते. हे गाणे झी म्युझिक कंपनी ने प्रकाशित केले आहे.

बिगबॉस १२ फेम रोमिल चौधरी, ज्याचा सामान्य मुलगा ते बिग बॉस स्पर्धक ते सेलिब्रिटी प्रवास अनेकांना आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देतो. याच्या हस्ते डॉ. रीना मेहता आणि अमित मिश्रा यांचा म्युझिक व्हिडिओ “बेचैनीया” अनावरीत करण्यात आला.

हेही वाचा - दाक्षिणात्य ॲक्शन आणि महाराष्ट्रीयन रोमान्सने भरलेला ‘लॉ ऑफ लव्ह’ चे टिझर झाले प्रदर्शित!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.