हैदराबाद - अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती व उद्योगपती राज कुंद्रावर अश्लील सिनेमे बनवून अॅपच्या माध्यमातून प्रसारित केल्याचा आरोप आहे. त्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी (दि. 19 जुलै) रात्री उशीरा अटक केली होती. आज त्याला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान सर्वच माध्यमांमध्ये याविषयाची चर्चा रंगल्याचे पाहायला मिळते.
-
शिल्पा शेट्टी और राज कुन्दरा बाबा रामदेव के शिष्य हैं,ध्यान,योग,साधना उन्होंने ही सिखायी है, फिर भी “ध्यान” भटक गया.
— Acharya Pramod (@AcharyaPramodk) July 19, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">शिल्पा शेट्टी और राज कुन्दरा बाबा रामदेव के शिष्य हैं,ध्यान,योग,साधना उन्होंने ही सिखायी है, फिर भी “ध्यान” भटक गया.
— Acharya Pramod (@AcharyaPramodk) July 19, 2021शिल्पा शेट्टी और राज कुन्दरा बाबा रामदेव के शिष्य हैं,ध्यान,योग,साधना उन्होंने ही सिखायी है, फिर भी “ध्यान” भटक गया.
— Acharya Pramod (@AcharyaPramodk) July 19, 2021
सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. आचार्य प्रमोद यांनी ट्विट करुन राज कुंदा आणि शिल्पा शेट्टी यांना टोला लगावला आहे. त्यानी ट्विटमध्ये लिहिलंय, "शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा बाबा रामदेव यांचे शिष्य आहेत, ध्यान, योग, साधना त्यांनीच शिकवली आहे. तरीही त्यांचे ध्यान कसे काय भरकटले."
आचार्य प्रमोद यांच्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया येत असताना दिसत आहेत. 'रामदेवच्या संगतीचा हा परिणाम आहे', असे एका युजरने लिहिलंय. तर दुसऱ्याने म्हटलंय की, 'आसाराम बापूचे ध्यान भरकटू शकते तर हा तर फक्त चेला आहे.'
हेही वाचा - अश्लील चित्रफीत प्रकरणी अटकेनंतर कुंद्राच्या 'या' व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा