मुंबई - आधी बंगालीत सुपरहिट ठरलेली ‘श्रीमोयी’ हिंदीत ‘अनुपमा’ बनून आली. अनुपमा मालिका हिंदीत कित्येक आठवडे टीआरपी मध्ये प्रथम स्थानावर आहे. आणि आता निर्माते राजन शाही यांनी ‘डायरेक्टर्स कट’ च्या बॅनरखाली मराठीतही बाजी मारली आहे. त्याच कथानकावरील मराठीत बनलेली मालिका ‘आई कुठे काय करते’ सुद्धा पहिल्या नंबरवरच आहे.
'आई कुठे काय करते’ मालिकेमध्ये अभिषेकवर झालाय प्राणघातक हल्ला!
स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील डॉक्टरी पेशामध्ये असणाऱ्या अभिषेकने रुग्णांची सेवा करत आपलं कर्तव्य बजावलं आहे. कोरोनासारख्या संकटातही घरापासून लांब रहात त्याने आपल्या कामालाच पहिलं प्राधान्य दिलं. आता मात्र एका रुग्णाच्या नातेवाईकाने त्याच्या पत्नी आणि मुलाचा खुन केल्याचा आरोप अभिषेकवर टाकला आहे. इतकंच नाही तर अभिषेकला बेदम मारहाण देखील केली आहे.
अभिषेकवर हल्ला