मुंबई - सध्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे कलाकार देखील घरात बसून वेळ घालवत आहेत. काही कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत आहेत. तर, काही कलाकार आपले छंद जोपासण्यात व्यग्र आहेत. बॉलिवूडचे आघाडीचे गायक अभिजीत भट्टाचार्य हे देखील सध्या लॉकडाऊनमुळे घरी आहेत. त्यांनी या वेळेत जुन्या गाण्यांच्या आठवणीला उजाळा दिला आहे. किशोर कुमार यांचे मुळ असलेले 'फुलो के रंगसे' हे गाणे त्यांनी गायले होते. या गाण्याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे.
- View this post on Instagram
Phoolon Ke Rang Se ..I will never stop #Entertaining u .. #StayHome #staysafe
">
अभिजीत भट्टाचार्य हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी कोरोनाविषयक जनजागृती असलेले गाणे देखील शेअर केले होते.
त्यांनी आपल्या जुन्या गाण्याचा व्हिडिओ पोस्ट करुन चाहत्यांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे.