ETV Bharat / sitara

झी मराठीवरील 'अळीमिळी गुपचिळी' शोमध्ये छोटे उडवणार मोठ्यांची भंबेरी - अतुल परचुरे 'झी मराठी' वाहिनीवर

'झी मराठी' वाहिनीवर ‘अळीमिळी गुपचिळी’ हा नवा शो सुरू होत आहे. अभिनेता अतुल परचुरे यांच्या सोबतच या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिनेत्री स्नेहलता वसईकर सांभाळणार आहे.

Aali Mili Gupchili chat show
झी मराठीवरील 'अळीमिळी गुपचिळी' शो
author img

By

Published : Jan 18, 2020, 9:10 AM IST

'झी मराठी' प्रेक्षकांसाठी एक नवीन चॅट शो लवकरच सुरू होणार आहे. ज्यात कलाकार त्यांच्या मुलांसोबत सहभागी होतील. या कार्यक्रमाचं नाव आहे ‘अळीमिळी गुपचिळी’. लहानांची मोठ्यांना कोपरखळी असलेला हा धमाल शो येत्या १७ जानेवारी पासून शुक्रवार आणि शनिवार रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेता अतुल परचुरे यांच्या सोबतच या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिनेत्री स्नेहलता वसईकर सांभाळणार आहे.

Aali Mili Gupchili chat show
झी मराठीवरील 'अळीमिळी गुपचिळी' शो

या कार्यक्रमाबद्दल सांगताना अभिनेत्री स्नेहलता वसईकर अस म्हणाली की, अळीमिळी गुपचिळी हा एक फॅमिली चॅट शो आहे. ज्यात कुटुंबातील लहान मुलांना जास्त प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांचे विचार, त्यांच्या आवडीनिवडी, गमतीजमती हे सगळं प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. लहान मुलांच्या धमाल मस्तीमुळे कशी अनेकदा आईवडिलांना अळीमिळी गुपचिळी करावी लागते हे प्रेक्षकांना या कार्यक्रमात पाहायला मिळेल.

या कार्यक्रमात अतुल परचुरे हे देखील सूत्रसंचलन करणार आहे. अतुल हा फारच अनुभवी कलाकार असल्याने तो अवघड सिच्युएशनसुद्धा एकदम सहज रित्या सांभाळण्यात वाकबगार आहे. त्यामुळे तो या शो ला नक्की नवीन उंची मिळवून देईल यात काहीही शंका नाही. अर्थात तो लहान मुलांचा लाडका मोहन दादा असल्याने तो कोणाशीही पटकन जुळवून घेतो. याशिवाय लहानगा अर्णव काळकुंद्री हा देखील या दोघांना साथ देणार आहे.

या आगळा वेगळ्या शो चा पहिला भाग नुकताच शूट झाला असून त्यात लहानग्यानी खूपच धमाल मस्ती केली आहे. प्रसंगी सूत्र संचालकांची विकेट काढण्यात देखील हे छोटे पाहुणे मागे पुढे पहात नाहीत. त्यामुळे आता या सगळयांनी केलेली मजा पाहण्यासाठी तरी आपल्याला पुढच्या शुक्रवारची वाट पाहावी लागेल.

Intro:'झी मराठी' प्रेक्षकांसाठी एक नवीन चॅट शो लवकरच सुरू होणार आहे. ज्यात कलाकार त्यांच्या मुलांसोबत सहभागी होतील. या कार्यक्रमाचं नाव आहे ‘अळीमिळी गुपचिळी’. लहानांची मोठ्यांना कोपरखळी असलेला हा धमाल शो येत्या १७ जानेवारी पासून शुक्रवार आणि शनिवार रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेता अतुल परचुरे यांच्या सोबतच या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिनेत्री स्नेहलता वसईकर सांभाळणार आहे.

या कार्यक्रमाबद्दल सांगताना अभिनेत्री स्नेहलता
वसईकर अस म्हणाली की, अळीमिळी गुपचिळी हा एक फॅमिली चॅट शो आहे. ज्यात कुटुंबातील लहान मुलांना जास्त प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांचे विचार, त्यांच्या आवडीनिवडी, गमतीजमती हे सगळं प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. लहान मुलांच्या धमाल मस्तीमुळे कशी अनेकदा आईवडिलांना अळीमिळी गुपचिळी करावी लागते हे प्रेक्षकांना या कार्यक्रमात पाहायला मिळेल.
या कार्यक्रमात अतुल परचुरे हे देखील सूत्रसंचलन करणार आहे. अतुल हा फारच अनुभवी कलाकार असल्याने तो अवघड सिच्युएशनसुद्धा एकदम सहज रित्या सांभाळण्यात वाकबगार आहे. त्यामुळे तो या शो ला नक्की नवीन उंची मिळवून देईल यात काहीही शंका नाही. अर्थात तो लहान मुलांचा लाडका मोहन दादा असल्याने तो कोणाशीही पटकन जुळवून घेतो. याशिवाय लहानगा अर्णव काळकुंद्री हा देखील या दोघांना साथ देणार आहे.

या आगळा वेगळ्या शो चा पहिला भाग नुकताच शूट झाला असून त्यात लहानग्यानी खूपच धमाल मस्ती केली आहे. प्रसंगी सूत्र संचालकांची विकेट काढण्यात देखील हे छोटे पाहुणे मागे पुढे पहात नाहीत. त्यामुळे आता या सगळयांनी केलेली मजा पाहण्यासाठी तरी आपल्याला पुढच्या शुक्रवारची वाट पाहावी लागेल. Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.