ETV Bharat / sitara

कोकणातील 21 निरागस बोबड्या बोलांनी सगळ्यांना घातली भुरळ - हिंदू धर्मियांचा सर्वात लाडका गणपती बाप्पा

कोरोनाच्या साथीमुळे यंदाचा गणेश उत्सव नेहमीच्या जोषात पार पडत नाही. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये नवचैतन्य जागविण्यासाठी *द हॅपनिंग कोकण*च्या टीमने बाप्पाचे गुणगान करणारी एक छोटीशी व्हिडिओ क्लिप बनवली आहे, जी चांगलीच व्हायरल होत आहे.

The Happening Konkan
द हॅपनिंग कोकण
author img

By

Published : Aug 28, 2020, 3:58 PM IST

Updated : Aug 28, 2020, 4:59 PM IST

ठाणे : गेले पाच ते सहा महिने कोरोनाच्या भयंकर महामारीने जगात थैमान घातले असून, कामधंदा नसल्याने सगळे हतबल झाले आहेत. त्यातच सणासुदीचे दिवस आल्याने हातात पैसा नाही, म्हणून सर्व सणांवर विरजण पडले आहे.

हिंदू धर्मियांचा सर्वात लाडका गणपती बाप्पा पण याच परिस्थितीत घरोघरी विराजमान झाले खरे परंतु, लोकांमध्ये फारसा उत्साह दिसत नव्हता. गणेशभक्तांमध्ये नवचैतन्य जागवण्यासाठी 'द हॅपनिंग कोकण'च्या टीमने बाप्पाचे गुणगान करणारी एक छोटीशी व्हिडिओ क्लिप बनवली आहे, जी चांगलीच व्हायरल होत आहे.

द हॅपनिंग कोकण

या क्लिपमध्ये त्यांनी आपला बाप्पा किती गोड आहे आणि त्याला भक्तीभावाने अर्पण केलेला साधा प्रसाददेखील कसा आवडतो याचे वर्णन केले आहे. कोरोनाशी लढणारे पोलीस, डॉक्टर आणि इतर कोरोना योद्धे हे देखील बाप्पाचे रूप असल्याचे या चिमुरड्यांनी सांगितले आहे.

Last Updated : Aug 28, 2020, 4:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.