टेलिव्हिजनवरील मालिका विश्वामध्ये कडूगोड आठवणींनी भरलेले भाग पाहून प्रेक्षक सुखावतात. संकटं झेलल्याशिवाय यश मिळत नाही आणि यश मिळविण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागतात ही शिकवण त्यांना नक्कीच मिळत असेल. ‘राजा रानीची गं जोडी’ मालिकाही प्रेक्षकांना मनोरंजनासोबतच उत्तम वर्तणुकीचे धडे देत असते. या मालिकेत भलेही राजा रानीवर संकटं ओढवली असतील परंतु ते नेटाने त्याचा मुकाबला करताना दिसताहेत आणि ते प्रेक्षकांना आवडतही आहे.
संजू आणि रणजीत एकमेकांच्या साथीने मोठयातलं मोठं संकट दूर करतात. ‘राजा व रानी’ या दोघांनी मिळून त्यांच्यावर आलेलं अरिष्ट परतवून लावले आहे. पुन्हा एकदा वाईटावर चांगल्याचा विजय झाला असं म्हणायला हरकत नाही. रणजीतच्या मार्गदर्शनामुळे संजूने खर्या गुन्हेगारांचा शोध लावला आणि गुलाबचा डाव मोडीत काढला आहे. संजूची जिद्द आणि प्रयत्नामुळे रणजीतची निर्दोष सुटका होणार आहे. गुलाब रणजीतला जी कठोर शिक्षा देण्याचा बेत आखत होती तो आता संजूमुळे पूर्ण होऊ शकणार आहे.
संजू आणि रणजीचं कौतुक मीडियाकर्मींकडूनही होणार आहे. रणजीतच्या सुटकेमुळे कुसुमावती नक्कीच खुश होतील पण रणजीत व कुसुमावती मधील अबोला दूर करताना संजूची कसोटी लागणार आहे. तो अबोला संजू कधी आणि कसा दूर करेल हे बघणे उत्सुकतेचे नक्कीच असेल. यानंतर गुलाब कोणतं नवं कारस्थान रचेल आणि अपर्णा व राजश्रीचे कारस्थान घरच्यांच्या समोर कधी येईल याचीही प्रतीक्षा प्रेक्षकांना आहे. या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच मालिकेमधून मिळणार आहेत. आता संजू कशी गुन्हेगारांपर्यंत पोहचणार, कशी रणजीतची सुटका करणार, कोणते अडथळे तिच्या मार्गात येणार, त्याला ती कशी पार करणार हे बघणे इंटरेस्टिंग असणार आहे.
‘राजा रानीची गं जोडी’ या मालिकेचे विशेष भाग २९ आणि ३० जुलैला प्रसारित होणार आहेत.
हेही वाचा - पॉर्नोग्राफी प्रकरणामध्ये राज कुंद्राला जामीन फेटाळला