मुंबई - मीडियात सध्या एक व्यक्ती जोरदार चर्चेत आहे. ऐश्वर्या राय आपली आई असल्याचा दावा तो करतोय. ३२ वर्षे वय असलेल्या संगीत कुमारने हा दावा केलाय.
ऐश्वर्या राय हिने 'आयव्हीएफ'च्या माध्यामतून लंडनमध्ये आपल्याला जन्म दिल्याचे संगीत कुमार म्हणतोय. त्याच्या मुलाखतीचा हा व्हिडिओ सध्या गाजतोय. १९८८ मध्ये त्याचा जन्म झालाय. तेव्हा ऐश्वर्या केवळ १५ वर्षे वयाची होती.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
मंगलोरमध्ये राहणाऱ्या संगीत कुमारचा हा व्हिडिओ जुनाच आहे. त्याच्या म्हणण्यानुसार ऐश्वर्या रायच्या आई वडिलांनी त्याचे २ वर्षे संगोपन केले. त्यानंतर त्याचे वडिल वडिवेलु रेड्डी यांनी त्याला विषाखापट्टनमला आणले.
संगीत कुमारचे म्हणणे आहे की त्याच्या नातेवाईकांनी त्याच्या जन्मासंबंधीचे दस्ताऐवज नष्ट केले आहेत. कागदपत्रे असती तर ठोस दावा केला असता असे तो म्हणतो. त्याला ऐश्वर्यासोबत मुंबईत राहायची इच्छा आहे.
त्याच्या व्हिडिओतील म्हणण्यानुसार २००७ मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन विभक्त झाले आहेत. यावरुन तो किती खरे बोलतोय याचा अंदाज येऊ शकतोय.
या संगीत कुमार व्यक्तीचे फेसबुकवर वेनीस कायले लॉर्ड कल्की असे नाव आहे. यात त्याने एक स्क्रिप्ट अपलोड केलीय. स्टिवन स्पिलबर्गच्या आगामी प्रोजेक्टसाठी स्क्रिप्ट करीत असल्याचा दावा त्याने यात केलाय.