ETV Bharat / sitara

महाराष्ट्रव्यापी असेल शंभरावं मराठी नाट्य संमेलन, १३ शहरात होणार साजरे - मराठी नाट्य संमेलन न्यूज

२५ मार्चला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची सुरुवात होईल.

100th Marathi Natya Sammelan press conference in solapur
महाराष्ट्रव्यापी असेल शंभरावं मराठी नाट्य संमेलन : प्रसाद कांबळी यांची घोषणा
author img

By

Published : Mar 8, 2020, 5:19 PM IST

सोलापूर - शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं आयोजन हे रिव्हर्स इंटिग्रेशन अशा स्वरूपात राहणार असून राज्यातील प्रमुख १३ शहरात हे संमेलन साजरे होणार आहे. ही माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

यावेळी अभिनेते शरद पोंक्षे, सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार, प्रमुख कार्यवाह ज्योतिबा काटे,उपाध्यक्ष विठ्ठल बडगंची यांच्यासह प्रमुख नाट्यकलावंत उपस्थित होते.

महाराष्ट्रव्यापी असेल शंभरावं मराठी नाट्य संमेलन : प्रसाद कांबळी यांची घोषणा

आजपर्यंत नाट्यकलावंत ग्रामीण भागातून येऊन शहरी थिएटर्समध्ये आपली कला सादर करतात. मात्र, यावेळी शहरी कलावंत जिल्ह्या-जिल्ह्यात जाऊन आपली कला सादर करणार आहेत. त्याची सुरुवात २७ मार्चला सांगली येथे नाट्यसंमेलनाच्या उदघाटनाने होणार आहे. त्यानंतर २० ते २३ मार्चला सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, अकलूज, आणि बार्शी या छोट्या शहरात नाट्य जागर आणि २४ ते २६ एप्रिल दरम्यान सोलापूरात हे संमेलन होणार आहे. त्यानंतर लातूर येथे पुढचे संमेलन होणार आहे. या नाट्य संमेलन पहिला टप्पा महाराष्ट्रात पार पडणार आहे. तर, दुसरा टप्पा भारतात पार पडेल.

कार्यक्रमाची रुपरेषा -

२५ मार्चला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची सुरुवात होईल. व्यंकोजीराजे यांनी १९ नाटके लिहिली आहेत. यादिवशी त्यांच्या नाट्यसंपदेला तंजावर येथे अभिवादन करण्यात येईल. २६ मार्चला रोजी सांगलीमध्ये नाट्यदिंडी होईल. यादिवशी संध्याकाळी सांगलीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात ‘सीता स्वयंवर’ या संगीत नाटकाचा प्रयोग होईल.२७ मार्च ते २९ मार्च दरम्यान नाट्य संमेलनाचा सोहळा.त्यानंतर संमेलनाच्या महाराष्ट्रातील ग्रामीण टप्प्याला सुरुवात होईल.

३० मार्च ते ७ जून दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी छोटी छोटी संमेलन होतील. राज्यामध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शाखा ज्या ठिकाणी आहेत तिथे हा उपक्रम पार पडेल. मुंबईत ८ ते १४ जून दरम्यान दिमाखदार सोहळ्यात समारोप होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.