मुंबई - देशात कोरोना विषाणूमुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. यातच सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांचा वेळ सत्कारणी लावला असून आपल्यातील इतर सुप्त कलागुणांना वाव दिला आहे. अभिनेत्री ट्विंकल खन्नाने आपल्या आजीकडून शिकलेल्या भरतकामाचा व्हिडिओ टि्वटर शेअर केला आहे.
'माझ्या आजीच्या घरात वाढत असताना, आम्ही सर्वजण पेंट करणे, शिवणकाम आणि विणकाम शिकलो. वीस वर्षानंतर मी पुन्हा भरतकाम करण्याचा प्रयत्न करत आहे. मला आताही माझ्या आजीचा आवाज ऐकू येतो, टीना काम नीट कर, असे अभिनेत्री ट्विंकल खन्नाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, सध्या ट्विंकल पती अक्षय कुमार आणि मुलांसोबत यूकेमध्ये आहे. अक्षय स्कॉटलंडच्या ग्लासगो येथे बेल बॉटम या चित्रपटाचे शूटिंग करणार आहे. अक्षय कुमारचा हा चित्रपट हेरगिरीच्या कथा आहे. जो 80 च्या दशक आधारित आहे. बेल बॉटम एक स्पाय म्हणजे गुप्तहेर असलेला थ्रिलर सिनेमा असणार असून सिनेमा 22 जानेवारी 2021 ला भेटीला येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन रंजीत एम. तिवारी करणार आहे आणि प्रोडक्शन वासु भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देखमुख, मोनिषा आडवाणी, मधु भोजवानी आणि निखिल आडवाणी हे मिळून करत आहेत.