ETV Bharat / sitara

लखनऊमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नावाने कोट्यावधींची फसवणूक ; गुन्हा दाखल

उत्तर प्रदेशमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नावाने कोट्यवधींची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी हजरतगंज कोतवाली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी
अभिनेत्री शिल्पा शेट्टी
author img

By

Published : Jul 9, 2020, 8:50 AM IST

लखनऊ - उत्तर प्रदेशमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नावाने कोट्यवधींची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी हजरतगंज कोतवाली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महानगरातील रहिवासी रोहितवीर सिंग यांनी मुंबईच्या एयोसिस स्पा एन्ड वेलनेस कंपनीचे एमडी किरण बावा आणि दिग्दर्शक विनय भसीन यांच्यासह 6 जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

दोन वर्षांपूर्वी 2018 मध्ये, एओसिस स्पा अँड वेलनेस कंपनीचा एमडी किरण बाबा याने मिदासदीप एंटरप्राइजच्या संचालकाकडून फ्रेंचायजी शुल्काच्या नावाखाली काही पैशांची गुंतवणूक करवून घेतली होती. किरण बाबा यांनी खोटी माहिती देऊन शिल्पा शेट्टी त्यांच्या कंपनीची ब्रँड एम्बासेडर आहे, असे सांगितले.

मात्र, पीडितने पैसै गुंतवल्यानंतर सतत नुकसान होत असल्याने कंपनीची चौकशी केली असता, आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पीडित इसमाने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी आणि त्याच्या कर्मचाऱ्यांविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.