ETV Bharat / sitara

FILM REVIEW: हसायला भाग पाडणारी गुड्डू अन् रश्मीची लिव्ह इन लव्हस्टोरी - kriti sanon

लुका छुपी
author img

By

Published : Mar 10, 2019, 3:00 PM IST

मुंबई - कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉनच्या मुख्य भूमिका असलेला 'लुका छुपी' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. लग्नाआधी एकमेकांना समजून घेण्यासाठी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा अट्टहास करणारी रश्मी म्हणजेच क्रिती आणि तिच्या हट्टापायी दोघांची होणारी फजिती प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळते. तुम्हालाही हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता असणार मात्र, चित्रपट पाहायला जाण्याआधी जाणून घ्या, या चित्रपटाविषयी खास..

गुड्डू म्हणजेच कार्तिक आर्यन चित्रपटात एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलाच्या भूमिकेत आहे. तर रश्मी म्हणजेच क्रिती उच्चशिक्षित आणि बिनधास्त, अशी एक मुलगी. रश्मीचे वडील कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे नेते असतात. ज्यांना प्रेमीयुगुलांनी भेटणे मान्य नाही. गुड्डू-रश्मीला लग्नाची मागणी घालतो. मात्र मॉडर्न विचारांची रश्मी लग्नाच्या जबाबदारीसाठी तयार नसल्याने एकमेकांना चांगल्या रितीने समजून घेण्यासाठी गुड्डूसमोर लिव्ह इन रिलेशनशिपचा प्रस्ताव ठेवते आणि दोघेही लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतात. यातूनच पुढे होणारी दोघांची फजिती पाहायला मिळते.

लव्हस्टोरीसोबतच कॉमेडीचा टच असलेला हा चित्रपट प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने कार्तिक आणि क्रिती पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसले असले तरीही त्यांची चित्रपटातील केमिस्ट्री प्रेक्षकांची मने जिंकते. या दोघांची लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची गोष्ट घरच्यांपासून लपवण्याची धडपड आणि या दरम्यान घडणाऱ्या अनेक विवोदी प्रसंगांनी चित्रपटात एक वेगळीच रंगत आणली आहे. लक्ष्मण उटेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Intro:Body:

यूपीए काळात तब्बल १२ 'एअर स्ट्राईक' करण्यात आले - मल्लिकार्जून खरगे

बंगळुरू - भाजपने आपल्या कार्यकाळात जवळपास ३ एअर स्ट्राईक केले, या केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी आपल्या काळातील एअर स्ट्राईक मोजून दाखवले आहेत. काँग्रेसच्या नेतृत्त्वामधील संयुक्त प्रगतिशील आघाडीने (यूपीए) भाजप सरकारपेक्षा जास्त एअर स्ट्राईक केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे शनिवारी कर्नाटकच्या दौऱ्यावर होते. दरम्यान हुबळी येथे एका सभेला संबोधित करताना त्यांनी यूपीए काळात भारताने तब्बल १२ एअर स्ट्राईक केले, असा दावा केला आहे. मात्र, असे असूनही आपण याचा गवगवा केला नाही, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांच्या जवळ विकासाच्या नावावर सांगण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे ते एअर स्ट्राईचा उपयोग निवडणूक प्रचारासाठी करत आहेत, असे त्यांनी म्हटले. तर, देशभरात कमी झालेल्या नोकऱ्यांवरही त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली. एनएसएसओचा संदर्भ देत मल्लिकार्जून म्हणाले की, देशामध्ये ३८ लाख नोकऱ्या कमी झाल्या आहेत. तर केवळ २७ लाख नव्या नोकऱ्या आल्या आहेत. मोदी सरकारने १० कोटी नोकऱ्या देण्याचे वचन दिले होते. मात्र, त्यांनी जनतेची दिशाभूल केली, असा आरोप त्यांनी यावेळी लावला.

आज निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी प्रचार कार्यक्रमामध्ये गति आणलेली आहे. त्यासाठी सोमवारी काँग्रेसच्या स्क्रिनिंग समितीची बैठक होणार आहे. त्यामध्ये लोकसभा निवडणुकांचे उमेदवार ठरवले जाणार आहेत.   

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.