ETV Bharat / sitara

'काश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना ब्रिटिश संसदेकडून निमंत्रण

author img

By

Published : Mar 30, 2022, 11:57 AM IST

''द काश्मीर फाइल्स'' चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी पल्लवी जोशी यांना ब्रिटिश संसदेकडून निमंत्रण मिळाले आहे. विवेक ब्रिटिश संसदेत या चित्रपटाबद्दल सांगणार आहेत.

विवेक अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी पल्लवी जोशी

मुंबई - 'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट राहिला नसून हिंदी चित्रपटसृष्टीत इतिहास बनला आहे. हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला आणि अजूनही चित्रपटगृहांमध्ये सुरू आहे. या चित्रपटामुळे बॉलिवूड आणि देशाच्या राजकारणात मोठा भूकंप झाल्याचे पाहायला मिलाले. आता परदेशातही या चित्रपटाचा बोलबाला होऊ लागला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी पल्लवी जोशी यांना ब्रिटिश संसदेकडून निमंत्रण मिळाले आहे. विवेक ब्रिटिश संसदेत या चित्रपटाबद्दल सांगणार आहेत.

एका मुलाखतीत विवेक अग्निहोत्रीने खुलासा केला आहे की, त्यांना ब्रिटीश संसदेने बोलावले आहे आणि त्यांना संसदेत काश्मिरी पंडितांच्या दुर्दशेबद्दल सांगायचे आहे. विवेक म्हणाला, ''आम्ही एप्रिलमध्ये ब्रिटनमध्ये जाऊन काश्मिरी पंडितांबद्दल चर्चा करणार आहोत, काश्मीर पंडितांवरील अत्याचार आणि नरसंहार जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्याच्या उद्देशाने 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट बनवण्यात आला आहे. मला आनंद आहे की आम्ही आमच्या उद्दिष्टात यशस्वी झालो आहोत.''

विवेक पुढे म्हणाला, ''चित्रपटाच्या माध्यमातून काश्मिरी पंडितांवरील अत्याचाराची भीषण आणि भीतीदायक कथा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे. आम्ही यासाठी काहीही केले नाही, कारण लोकांवर प्रभाव टाकण्याची ताकद आमच्यात नाही, हे सर्व देवाच्या हातात आहे, आम्ही फक्त एक माध्यम आहोत.''

केवळ 15 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींहून अधिकचा व्यवसाय करून इतिहास रचला आहे. चित्रपटाची कथा 1990 मध्ये काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाची आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार आणि इतर अनेक कलाकार आहेत.

हेही वाचा - Kgf Chapter 2 च्या ट्रेलरने तोडले रेकॉर्ड, २४ तासांत १०९ दशलक्ष व्ह्यूज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.