मुंबई - बॉलिवूडची आघाडीची दिग्दर्शिका झोया अख्तर आता 'घोस्ट स्टोरीज' घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'घोस्ट स्टोरीज'च्या शूटिंगलाही सुरुवात झाली आहे. तिने एक फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.
'रोलिंग' आणि 'रॉकिंग' #घोस्टस्टोरीज', असे कॅप्शन देऊन झोयाने चित्रपटाच्या क्लॅपबोर्डचा फोटो शेअर केला आहे.
'लस्ट स्टोरीज'चे दिवाकर बॅनर्जी देखील झोयासोबत घोस्ट स्टोरीजवर काम करणार आहेत. ही एक वेबसीरिज असणार आहे. त्यामुळे आता यामध्ये भूतांच्या
कथा कशाप्रकारे दाखवण्यात येतील, यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
नेटफिल्क्सवर ही वेबसीरिज स्ट्रिम करता येणार आहे.