मुंबई - नववर्षाचे स्वागत याही वर्षी घरात बसूनच करावे लागणार आहे. पुन्हा झालेला कोरोना उद्रेक व मिनी-लॉकडाऊनचे संपूर्ण लॉकडाऊनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता गृहीत धरून गेल्या वर्षीप्रमाणेच हा गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा होऊ शकणार नाही आहे. मात्र, झी टॉकीज ने मराठी प्रेक्षकांसाठी गुढीपाडव्याची भेट आणली आहे. फार पूर्वी पासून चित्रपट आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहेत. चित्रपट मनोरंजनाच्या उद्देशानेच बनवलेले असतात. काही चित्रपट वेगळ्या धाटणीचे असतात ज्यांची मांडणी, थिम थोड्या अनोख्या पद्धतीने आखलेल्या असतात. १३ एप्रिलला सकाळी ९ वाजल्यापासून प्रेक्षक झी टॉकीजवर सदाबहार चित्रपटांची मेजवानी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अनुभवू शकतात.
मराठी नववर्षाची सुरुवात काही चित्रपटांसोबत झी टॉकीज वाहिनी प्रेक्षकांसोबत करणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी झी टॉकीज आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी काही खास चित्रपट सादर करणार आहे. १३ एप्रिलला सकाळी ९ वाजता मकरंद अनासपुरे याचा सुपरहिट चित्रपट 'दे धक्का' प्रसारित होईल. त्यानंतर ११ वाजता देऊळ बंद हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. दुपारी १.३० वाजता सायली संजीव हिचा बस्ता तर ४ वाजता सचिन आणि सुप्रिया पिळगावकर या धमाल जोडीचा 'नवरा माझा नवसाचा' हा चित्रपट प्रसारित होईल आणि रात्री श्रीखंड पुरीच्या बेतासोबत रात्री १० वाजता मी शिवाजी राजे भोसले बोलतोय या चित्रपटाचा आस्वाद प्रेक्षक घेऊ शकतात. झी टॉकीजवर नवीन वर्षाची सुरुवात धमाकेदार चित्रपटांसोबत होणार असून सकाळी ९ वाजल्यापासून 'गुढीपाडवा फिल्म फेस्टीवल’ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.