मुंबई - चित्रपट निर्माता आदित्य चोप्रा शाहरुख खानची भूमिका असलेला पठाण आणि सलमान खानची भूमिका असलेल्या टायगर 3 या चित्रपटातून स्पाय युनिव्हर्सचा विस्तार करण्यासाठी उत्सुक आहे. खान मंडळींचा क्रॉसओवर यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा आधार तयार करेल. यामध्ये हृतिक रोशनचाही समावेश करण्याचाही हेतू यशराज फिल्म्सचा होता. मात्र हृतिक रोशनने ही ऑफर नाकारली आहे.
याआधीच्या बातम्यांमध्ये असे आले होते की YRF च्या स्पाय युनिव्हर्समध्ये सलमान खान पठाण चित्रपटामध्ये कॅमिओ करणार आहे आणि शाहरुख खान टायगर 3 मध्ये कॅमिओ करणार आहे. तर दोन्ही खान वॉर 2 मध्ये कबीरच्या भूमिकेतील हृतिक रोशनसोबत सामील होतील,
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
ताज्या अहवालानुसार असे सूचित होते की हृतिक रोशन YRF च्या गुप्तचर विश्वात सामील होण्यास इच्छुक नाही. चर्चेत असे पुढे आले आहे की पठाण चित्रपटामध्ये ह्रतिक कबीर बनून जाणार नाही आणि केवळ सलमान पठाणमध्ये टायगर या व्यक्तीरेखेसह कॅमिओ बनून पोहोचणार आहे.
वेबलॉइडच्या रिपोर्टनुसार, आदित्य चोप्राने हृतिकला गुप्तचर विश्वाचा एक भाग बनण्याची ऑफर दिली होती, परंतु अद्याप ह्रतिकने होकार दिलेला नाही. त्याला पठाण आणि टायगर 3 या दोघांची ऑफर देण्यात आली होती, परंतु हृतिकने दोघांनाही होकार दिलेला नाही. त्यामुळे YRF च्या गुप्तचर विश्वाचे नेतृत्व सलमान खान टायगरच्या भूमिकेत करेल आणि शाहरुख खान पठाणच्या भूमिकेत सामील होईल.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान, हृतिक पुढे विक्रम वेधा या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात हृतिक आणि सैफ अली खान प्रमुख भूमिकेत असून राधिका आपटे महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे मूळ लेखक आणि दिग्दर्शक पुष्कर आणि गायत्री हिंदी रिमेकसाठी देखील दिग्दर्शकाच्या भूमिकेत असतील.
हेही वाचा - देवाबद्दलच्या वादग्रस्त विधानानंतर श्वेता तिवारीने मागितली माफी