मुंबई (महाराष्ट्र) - KGF मधील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता यश आपला वाढदिवस साजरा करीत आहे. या खास प्रसंगी यशने इंस्टाग्रामवर आपल्या मुलांसोबत आणि पत्नीसोबत वाढदिवसाचा केक कापतानाचा फोटो शेअर केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
फोटोत तो त्याच्या वाढदिवसाच्या केकसमोर उभा असून आपल्या मुलाला आणि मुलीला धरलेले दिसत आहे. फोटोसोबत, यशने एक टीप लिहिली आहे त्यात त्याने शेअर केले की तो त्याच्या वाढदिवसाबद्दल कधीही उत्साही असत नाही.
"वाढदिवसामुळे मी कधीच उत्तेजित होत नाही... मला आजूबाजूला आनंद दिसत आहे, विशेषत: माझ्या लहान मुलांमुळे, तो मला पुढे नेत असतो. प्रेम आणि आशीर्वादांसाठी माझ्या प्रत्येक चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे आभार मानण्याची ही संधी घेऊ इच्छितो. आशा आहे की प्रत्येकजण सुरक्षित आहात. काळजी घ्या," असे यशने लिहिले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान KGF 2 चे बॅनर असलेल्या Hombale Films ने यशला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी 'रॉकी भाई' चे नवीन पोस्टर प्रसिध्द केले आहे. गेल्या वर्षी त्याच्या वाढदिवशी रिलीज झालेल्या KGF 2 ट्रेलरने लाखो व्ह्यूज मिळवले होते आणि देशभरात तो ट्रेलर गाजला होता.
KGF 2 हा कन्नड चित्रपट तामिळ, तेलुगु, मल्याळम आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट कन्नडमध्ये बनला असून, या चित्रपटात रॉकी भाईची भूमिका साकारणारा यश स्वत:साठी हिंदीत डबिंग करणार आहे. यात खलनायक अधीराची भूमिका संजय दत्तने केली आहे आणि या चित्रपटात रवीना टंडन देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.
हेही वाचा - 'बुर्ज खलिफा'तील इव्हेन्टमध्ये १५ लाखांच्या पोशाखात उर्वशी रौतेला फोटो पहा