२०११ मध्ये जेव्हा कंटॅजन नावाचा चित्रपट खोकल्याच्या सुरूवातीच्या दृष्यासह रूपेरी पडद्यावर अवतरला, तेव्हा स्टिव्हन सोडरबर्गच्या कल्पकतेने अखेर आपली चमक दाखवली. या चित्रपटात रिकामे विमानतळ, कचऱ्या भरलेले रस्ते, दुकानांमधून घाबरून केली जाणारी भरमसाठ खरेदी, चीनमधून एका स्पर्षाने उत्सर्जित होणाऱ्या संक्रमणामुळे त्वरित संसर्ग होत असल्याचे दाखवले होते. हा चित्रपट दुःस्वप्नांनी भरलेला होता - आईने प्रेमाने कुशीत घेणे हे विषारी ठरू शकते आणि प्रियकराचे चुंबन हे मृत्युचे चुंबन ठरू शकते. मात्र, आता तुम्ही एखाद्याला कॉल करा आणि खोकल्याची रिंगटोन तुमचे स्वागत करते. तुम्ही किराणा खरेदी करण्यासाठी गेलात आणि जर तेथे सरकारी सूचना नसतील तर लोक जीवनावश्यक वस्तु खरेदी करण्यासाठी एकमेकांच्या अंगावर पडताना दिसतील. तसेच, विमानतळांबाबत बोलायचे तर, तेथे अलिकडे कोण गेले आहे? आणि हो, तेथे लस आणि औषधोपचारांचा शिष्टाचारही नाही.
जेव्हा हॉलिवुडचा प्रश्न येतो, तेव्हा चित्रपटात दाखवलेले विषय हे नेहमीच वास्तवाच्या कितीतरी पुढे आहेत, असे दिसते. १९९५ मध्ये डस्टिन हाफमन आणि मॉर्गन फ्रीमन दोघे एका शहराला वाचवण्यासाठी लढाईवर निघाले आहेत कारण या शहरात असा भयानक फ्ल्यू पसरला आहे की तो मानवतेला धोका निर्माण करत आहे. जेव्हा हवामानातील बदल अमेरिकेला तडाखा देत होते तेव्हा मॅड मॅक्स : फ्युरी रोड या २०१५ मध्ये आलेल्या चित्रपटात पाण्याशिवाय तडफडणाऱ्या जगाचे हाल दाखवले होते. २०१६ मध्ये मार्गारेट अटवुडच्या द हँडमेड्स टेलचा रूपेरी अवतार आला ज्यात स्त्रीजातीचा द्वेष करणाऱ्या अध्यक्षाने अगदी आनंदाने देशाची घटनाच त्याला शक्य असते तर स्थगित केली असती.
आम्हाला वाटत असलेली भयानक भीती आणि आमच्या सर्वात गडद कल्पनांपर्यंत हॉलिवुड पोहचते. म्हणून हॉलिवुडला अमेरिकेतून ४२ अब्ज अमेरिकन डॉलर आणि अमेरिकेच्या बाहेरून ३० अब्ज अमेरिकन डॉलर इतके उत्पन्न येते, यात काहीच आश्चर्य नाही. त्यामुळे हॉलिवुडला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय महासत्ता बनवले आहे. आम्हाला सर्वात जिव्हाळ्याच्या वाटत असलेल्या चिंता घेऊन त्या उच्च कलेच्या माध्यमातून साकार करण्याची त्याची क्षमता विलक्षण आहे. चिल्ड्रन ऑफ मेन (२०१६) हा दिग्गज मेक्सिकन दिग्दर्शक अल्फोन्सो क्युअरॉनचा चित्रपट घ्या. त्याची कथा अशी आहे की त्यात एका विषाणुने महिलांना वंध्या बनवले आहे आणि काहीही आशा उरलेली नाही-फक्त एक तरूण महिला गरोदर होते आणि तिला बेफाम जमावातून सुरक्षित घेऊन जायचे आहे.
28 डेज लेटर्स (२००२) चित्रपटामध्ये उद्याचे विनाश झालेले जग दाखवले आहे आणि त्यात क्रोध हाच प्रमुख मूलभाव आहे, मग ते सर्वनाशानंतरचे जग असेल ज्यात सिलियन मर्फी हा कोमात गेलेला माणूस संतापाच्या विषाणुने संसर्ग झालेल्या मानवांबरोबर जागा होतो. ब्लाईंडनेस(२००८) चित्रपट जोस सारामागोच्या चमकदार कादंबरीवर आधारित होता ज्यात अंधपणा आणणाऱ्या विषाणुने जगाला संसर्गित केले आहे आणि त्यातही पृष्ठभागाखाली संतापच उकळत आहे. आणि पुन्हा येथेही, महिलांना शरिरसुखाचा निर्वाणीचा सौदा करावा लागतो - कारण अन्नाचे मुखत्यार असलेले अंध लोक खाद्यपदार्थ केवळ शरिरसुखाच्या बदल्यात देणार असतात.
अलिकडच्या काळात मानवता सर्वात खालच्या पातळीवर गेलेली आहे, सहानुभूतीशून्य लोकनियुक्त नेते लोकांमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या ओळखीच्या आधारावर, मग ती धर्म असो, जात असो की लिंग, भेदभाव करत आहेत आणि ती समुदायातून माघार घेत व्यक्तिगत पातळीवर येत आहे. त्यानुसार चित्रपटातील खलनायकांमध्येही परिवर्तन होत आहे. युद्धाला कारण ठरणाऱ्या मोठ्या देशांच्या सरकारांपासून ते मृत्यु लादणाऱ्या दहशतवादी संघटनांपर्यंत, आम्हाला भेडसावणाऱ्या सर्वात तीव्र अशा अंतर्गत भीतीचा आलेख चित्रपटांमध्येही मांडला जात आहे.
पण महामारीच्या चित्रपटांचा संदेश स्पष्ट आहेः जोपर्यंत साथीचा रोग आम्हाला एकमेकांपासून सामजिक अंतर राखत एकमेकांचा शत्रु बनवतो, तो आम्हाला एकत्रही आणतो. एकटा कुणीही अदृष्य शत्रुशी लढा देऊ शकत नाही. त्यासाठी सांघिक कार्य आणि सहयोगाची आवश्यकता असते. संदर्भाशिवाय धोरण हे अर्थहीन असते. जर रोगातून लोक बरे झाले आणि उपासमारीने मेले तर तो मानवी जिद्दीचा विजय होत नाही तर जे काही उदात्त आणि मानवी आहे, त्याचा पराभव आहे. भारतातील एक प्रमुख विषाणुतज्ञ शाहिद जमील यांनी म्हटल्याप्रमाणे हा विषाणु धनाढ्य आणि गरिब, राजेशाही आणि सामान्य यांना सारख्याच प्रमाणात तडाखा देईल. तो न्यायासाठी संघर्ष करणारा आहे. तो समावेशकही आहे-तो धर्म, जात, आर्थिक दर्जा, लिंग या कोणत्याही बाबतीत भेदभाव करत नाही.
आशिक अबु यांच्या व्हायरस (२०१९) या मल्याळम चित्रपटात त्या प्रदेशातील सर्वात चांगले कलाकार आहेत, २०१८ मध्ये खरोखर आलेल्या निपाह विषाणुच्या उद्रेकावर आधारित उरात धडकी भरवणारा वैद्यकीय थ्रिलर कसा असतो, त्याचे नेमकेपणाने प्रतिबिंब त्यात होते. केएस शैलजा टीचर (या चित्रपटात ती सीके प्रमिला बनते आणि ही भूमिका रेवतीने केली आहे) कोझिकोड येथील रूग्णालयातील डॉक्टर्स आणि परिचारिकांवर होता, ज्या चित्रपटात तत्पर सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणिबाणीच्या वेळेला कसा प्रतिसाद देते याचे यथार्थ चित्रण केले होते. त्यात एकत्र काम करण्याची ताकद दाखवली आहे, ज्याची भारताला आता स्पष्टपणे जाणीव झाली आहे, कारण सरकारे एनजीओ, परोपकारी कॉर्पोरेट्स आणि उदार व्यक्तिंच्या हातात हात घालून काम करत आहेत.
दीपा मेहता गेल्या वर्षी जेव्हा नेटफ्लिक्सच्या लैला या मिनी सीरिजची रचनात्मक दिग्दर्शक या नात्याने जाहिरात करत होत्या तेव्हा त्यांनी म्हटले होते की, आम्ही सर्व आता शालिनी आहोत. शालिनी ही मुख्य पात्र असते जी वाढत्या पाणींटंचाईच्या जगात, मिनरल वॉटर पित आणि प्रदूषणविरोधी मास्क लावून मध्यमवर्गीयांचे आरामदायक जीवन जगत असते. ती कथा प्रयाग अकबर यांच्या पुस्तकावर आधारित विनाशाची होती, पण ती खूप वास्तवही होती, जी निसर्गाविरूद्धच्या युद्धात महिलांच्या गर्भाशयाविरूद्ध युद्धाच्या मिश्रणची कथा होती. लैलामध्ये जग पुन्हा पूर्वीसारखे कधीच होणार नाही. प्रत्यक्षात, विश्वाला अजून तसे होण्यास अवकाश आहे.
- कावेरी बामझाई