ETV Bharat / sitara

काय आहे 'आर्टिकल १५'? जाणून घ्या याविषयी

दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यापूर्वी त्यांनी 'मुल्क' चित्रपटातूनही गंभीर विषय हाताळला होता. आता पुन्हा एकदा 'आर्टिकल १५' या चित्रपटातून ते एका सत्य घटनेवर प्रकाश टाकणार आहेत.

काय आहे 'आर्टिकल १५'? जाणून घ्या याविषयी
author img

By

Published : Jun 21, 2019, 8:06 AM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा 'आर्टिकल १५' हा चित्रपट येत्या २८ जून रोजी प्रदर्शित होत आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यापूर्वी त्यांनी 'मुल्क' चित्रपटातूनही गंभीर विषय हाताळला होता. आता पुन्हा एकदा 'आर्टिकल १५' या चित्रपटातून ते एका सत्य घटनेवर प्रकाश टाकणार आहेत. त्यापूर्वी 'आर्टिकल १५' म्हणजे नेमकं काय, हे जाणून घेणं गरजेचं आहे.

'आर्टिकल १५'चा संविधानातील तिसऱ्या भागात समावेश केला गेला आहे. यामध्ये देशाच्या प्रत्येक नागरिकाला समान अधिकार असल्याचे नमुद केले आहे. कोणत्याही राज्याने अथवा नागरिकाने व्यक्तीची जात, धर्म, रंग, लिंग आणि जन्माचं ठिकाण पाहून त्यांच्यामध्ये भेदभाव करू नये, असा उल्लेख यामध्ये आहे. जातीवरून होणारे गुन्हे टाळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'आर्टिकल १५' चा संविधानात समावेश केला आहे.

'आर्टिकल १५' चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्यामुळे ट्रेलरवरुनच त्याची दाहकता प्रेक्षकांच्या हृदयाला भिडली. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता पाहायला मिळते. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दोन किशोरवयीन मुली झाडाला लटकलेल्या अवस्थेत पाहायला मिळतात. त्यांची केस हाताळणारे पोलीस अधिकारी त्यांनी आत्महत्या केली असे भासवतात. मात्र, त्यांच्यावर बलात्कार होऊन त्यांची हत्या केलेली असते. त्या मुली कनिष्ठ जातीतल्या असल्यामुळे त्यांची केस दाबल्याचा प्रयत्न होताना या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. मात्र, एका पोलीस अधिकाऱ्याच्या पुढाकारामुळे या प्रकरणाचा छडा लागतो.

आयुष्मान खुराना या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. आता या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्वपूर्ण ठरणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.