ETV Bharat / sitara

शाहरुखच्या चित्रपटासाठी चाहते आतुर, ट्विटरवर ट्रेण्ड होतोय हॅशटॅग - simba

'झिरो' चित्रपटानंतर शाहरुखने कोणताही चित्रपट साईन केलेला नाही. त्यामुळे त्याला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. या हॅशटॅगमार्फत त्याचे चाहते त्याच्यासाठी आपल्या मनातील भावना व्यक्त करत आहेत.

शाहरुखच्या चित्रपटासाठी चाहते आतुर, ट्विटरवर ट्रेण्ड होतोय हॅशटॅग
author img

By

Published : Jul 28, 2019, 5:00 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुखचे भारतातच नाही तर जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. त्याच्या या वाढत्या लोकप्रियतेमुळे तो ग्लोबल स्टार म्हणून ओळखला जातो. मात्र, बऱ्याच दिवसापासून तो रुपेरी पडद्यापासून लांब आहे. त्याच्या 'झिरो' चित्रपटानंतर तो कोणत्याही चित्रपटात झळकला नाही. त्यामुळे त्याचे चाहते बैचेन झाले आहेत. त्यामुळे चाहत्यांनी त्याच्या पुनरागमनासाठी ट्विटरवर एक हॅशटॅग सुरू केला आहे. हा हॅशटॅग सध्या नंबर एकवर ट्रेण्ड करत आहे.

'#WeMissSRKOnBigScreen', असा हा हॅशटॅग आहे. या हॅशटॅगने दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषच्या हॅशटॅगलाही मागे टाकले आहे. आज धनुषचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त देखील एक हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेण्ड होतोय. मात्र, त्याचा हॅशटॅग शाहरुखसमोर मागे पडला. यावरुनच शाहरुखच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येतो.

'झिरो' चित्रपटानंतर शाहरुखने कोणताही चित्रपट साईन केलेला नाही. त्यामुळे त्याला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. या हॅशटॅगमार्फत त्याचे चाहते त्याच्यासाठी आपल्या मनातील भावना व्यक्त करत आहेत.

काही महिन्यांपूर्वी शाहरुख फरहान अख्तरच्या 'डॉन ३' चित्रपटात झळकणार असल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, शाहरुखने याबाबत काहीच माहिती दिली नाही.

  • No. 1 Actor Acc. to BOI.

    Most No. of BO records India, Overseas & Worldwide.

    Most No. of Inter. Honors.

    Most awarded Actor in the world.

    Listed in among Most powerful people in the world.

    Biggest crowd puller.

    Bollywood’s Biggest Global Icon. @iamsrk #WeMissSRKOnBigScreen pic.twitter.com/TzbDNwzyhg

    — JISHAN. (@iamsrkJishan_) July 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'द लॉयन किंग' या चित्रपटात शाहरुखने त्याचा आवाज दिला आहे. तसेच त्याचा मुलगा आर्यन खान यानेही यातील पात्राला आवाज दिला आहे. मात्र, तो पडद्यावर दिसणार, याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.