‘वेल डन बेबी’ ही एका तरुण जोडप्याची हृदयस्पर्शी कथा आहे. आधुनिक जगातील एक तरुण जोडपं (अमृता खानविलकर आणि पुष्कर जोग) आपल्या लग्नाचा उद्देश शोधण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करताहेत. पण, नशीबच त्यांना तो उद्देश देऊ करते. नवीन लग्न झालेल्या तरुण पिढीला गरोदरपणातील समस्या हाताळण्यासाठी हा चित्रपट मदत करेल. ‘पॅरेंटिंग’ हा विषय या चित्रपटातून संवेदनशीलतेने हाताळण्यात आला आहे.
'वेल डन बेबी’: पाहा, पुष्कार जोग आणि अमृता खानवीलकरची संवेदनशील मुलाखत - मराठी चित्रपट 'वेल डन बेबी’
बहुप्रतिक्षित मराठी सिनेमा वेल डन बेबीचा ९ एप्रिल २०२१ रोजी खास प्रीमिअर अमेझॉन प्राइम व्हिडीओवर होणार आहे. या चित्रपटामध्ये पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते यांच्या प्रमुख भूमिका असून प्रियंका तंवर यांनी दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाबद्दल पुष्कर जोग आणि अमृता खानविलकर यांनी ईटीव्हीचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांनी घेतलली मुलाखत जरुर पाहा.
पुष्कार जोग आणि अमृता खानवीलकरची संवेदनशील मुलाखत