मुंबई - 'वेल डन बेबी' हा चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ वर प्रीमियर होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. 'आई-बाबा' या गाण्यानंतर या चित्रपटाचे 'हलकी हलकी' हे नवीन गाणे प्रदर्शित केले.
चमकदार सिनेमॅटोग्राफीसह लक्षवेधक झलकी अशी या गाण्याची ओळख देता येईल. 'वेल डन बेबी'चे 'हलकी हलकी' हे गाणे हे एक परिपूर्ण सौंदर्याने नटलेले कर्णमधुर गाणे आहे. हे नवे गाणे आणि याचे सुखद संगीत कौटुंबिक-नाट्य असलेल्या या कथेत अगदी उत्तम प्रकारे बसते. याच्या लक्षवेधक व्हिडिओतील चमकदार सिनेमॅटोग्राफीसह या गाण्याचे बोल श्रोत्यांच्या हृदयाची अचूक तार छेडतात.
'वेल डन बेबी' ची कहाणी आधुनिक काळातील जोडप्याभोवती फिरत आहे, जे घटस्फोट घेणार आहेत, परंतु नशिबाने त्यांना आश्चर्यकारकरीत्या एका वळणावर आणून उभे केले आहे. प्रियंका तन्वर दिग्दर्शित आणि मर्मबंध गव्हाणे लिखित, या चित्रपटात पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
रोहन-रोहन यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत रोहन प्रधान यांनी गायले असून वलय मुळगुंड यांनी लिहिले आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या चित्रपटाच्या पहिले गाणे 'आई-बाबा'ला अप्रतिम प्रतिसाद मिळत आहे. कानसेनांचे पाय याच्या संगीतावर उत्साहाने थिरकायला लागले असून त्यांनी ते गाणे गुणगुणायला देखील सुरुवात केली आहे.
आनंद पंडित, मोहन नादर आणि पुष्कर जोग निर्मित आणि व्हिडीओ पॅलेसद्वारे सादर करण्यात येत असलेला हा चित्रपट भारतातील प्राईम सदस्य ९ एप्रिल २०२१ पासून अमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहू शकतील.