ETV Bharat / sitara

अनुष्काला पहिल्यांदा भेटल्यानंतर 'अशी' होती विराटची प्रतिक्रिया - अनुष्का शर्मा

पहिल्यांदा जेव्हा विराटला शॅम्पूच्या जाहिरात करायची होती, तेव्हा त्याला अनुष्का शर्मा त्याच्यासोबत काम करणार असल्याची माहिती नव्हती. त्याला जेव्हा समजले की त्याला अनुष्कासोबत स्क्रिन शेअर करायची आहे, तेव्हा तो कमालीचा अस्वस्थ झाला होता.

अनुष्काला पहिल्यांदा भेटल्यानंतर 'अशी' होती विराटची प्रतिक्रिया, उलगडला रंजक किस्सा!
author img

By

Published : Sep 6, 2019, 9:44 AM IST

Updated : Sep 6, 2019, 10:44 AM IST

मुंबई - कला आणि क्रिकेट विश्वातील लोकप्रिय जोडपं म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. ४ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली होती. एका शॅम्पूच्या जाहिरातीसाठी दोघेही पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. त्यावेळी विराटची पहिली प्रतिक्रिया काय होती, याचा उलगडला खुद्द विराटनेच केला आहे.

एका माध्यमाशी बोलताना विराटने त्याच्या आणि अनुष्काच्या नात्याविषयी बरेचसे रंजक किस्से उलगडले आहेत. त्यांच्या पहिल्या भेटीपासून तर लग्नापर्यंतचा प्रवास कसा होता हेही त्याने सांगितले आहे.

हेही वाचा-साहोला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद, श्रद्धाने मानले आभार

पहिल्यांदा जेव्हा विराटला शॅम्पूच्या जाहिरात करायची होती, तेव्हा त्याला अनुष्का शर्मा त्याच्यासोबत काम करणार असल्याची माहिती नव्हती. त्याला जेव्हा समजले की त्याला अनुष्कासोबत स्क्रिन शेअर करायची आहे, तेव्हा तो कमालीचा अस्वस्थ झाला होता. एका प्रोफेशनल कलाकारासोबत भूमिका साकारायची म्हटल्यावर तो नर्व्हस झाला होता. त्यामुळे तो मुद्दामहून अनुष्कासमोर त्याची विनोदशैली वापरत असे.

अनुष्कासमोर काय करावं हे काहीही समजत नसल्याने विराटनं तिच्या हिल्सवरुन विनोद केला होता. जेव्हा अनुष्का त्याच्यासमोर हिल्स घालून आली होती, तेव्हा ती त्याच्यापेक्षाही उंच दिसत होती. त्यामुळे विराटनं तिला म्हटलं होतं, की ' तुझ्याकडे यापेक्षाही उंच हिल्स नव्हत्या का? विराटच्या या प्रश्नामुळे अनुष्कादेखील थोडावेळ भांबावली होती. मात्र, विराटने तिला नंतर हसवलं, असंही त्यानं सांगितले आहे.

हेही वाचा-हैदराबादमध्ये 'छिछोरे'ची प्रेस स्क्रीनिंग, जाणून घ्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

विराट आणि अनुष्काने त्यानंतर बऱ्याच जाहिरांतीमध्ये एकत्र काम केले. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनीही चांगला प्रतिसाद दिला. २०१७ मध्ये त्यांनी इटलीमध्ये लग्नगाठ बांधली.

Intro:Body:

entertainemnt

Conclusion:
Last Updated : Sep 6, 2019, 10:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.