ETV Bharat / sitara

विक्रम गोखलेंसाठी 'बिग बी' लावणार का हजेरी? पाहा, 'एबी आणि सीडी'चा टीझर - AB aani CD marathi latest film news

या चित्रपटाच्या निमित्ताने विक्रम गोखले आणि अमिताभ बच्चन पहिल्यांदाच एकत्र भूमिका साकारताना दिसणार आहेत.

VIkram Gokhale and Amitabh Bachchan starer AB aani CD marathi film Teaser out
विक्रम गोखलेंसाठी 'बिग बी' लावणार का हजेरी? पाहा, 'एबी आणि सीडी'चा टीझर
author img

By

Published : Feb 23, 2020, 2:20 PM IST

मुंबई - मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला 'एबी आणि सीडी' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. आता या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

या टीझरमध्ये विक्रम गोखले आपल्या वृद्धत्वानंतर येणाऱ्या अनुभवांविषयी बोलताना दिसतात. तर, अमिताभ बच्चन हे त्यांचे खास मित्र असल्याचा अंदाज टीझरवरुन येतो. त्यांची बऱ्याच वर्षानंतर भेट होणार असते. तसं पत्र देखील अमिताभ विक्रम यांना पाठवतात. मात्र, ऐनवेळी अमिताभ या कार्यक्रमात हजेरी लावू शकतील की नाही, याबद्दल उत्कंठा वाढली आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हेही वाचा -'इंडियन आयडल ११'च्या सेटवर परिक्षकांना अश्रु अनावर, पाहा 'ग्रँड फिनाले'चा प्रोमो

या चित्रपटाच्या निमित्ताने विक्रम गोखले आणि अमिताभ बच्चन पहिल्यांदाच एकत्र भूमिका साकारताना दिसणार आहेत. अमिताभ बच्चन यांनाही मराठी चित्रपटात भूमिका साकारताना पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार असल्यामुळे या चित्रपटाची बरीच उत्सुकता आहे. शिवाय टीझरच्या शेवटी अमिताभ यांचा आवाज सर्वांचे लक्ष वेधून घेतो.

मिलिंद लेले यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अक्षय बरदापूरकर, अभयानंद सिंग, अरविंद रेड्डी, कृष्णा परसोद आणि पीयूष सिंग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. १३ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा -'फ्रेंड्स'चं होणार रियुनियन, 'या' कारणासाठी येणार पुन्हा एकत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.