मुंबई - दाक्षिणात्य अभिनेता विजय देवराकोंडाने करण जोहरची चक्क ४० कोटी रुपयांची ऑफर नाकारली आहे. त्याचा 'डियर कॉम्रेड' हा चित्रपट दक्षिणेत गाजतोय. तो पाहिल्यानंतर याचा हिंदीत रिमेक करण्याची कल्पना करण जोहरने केली होती. या चित्रपटात विजयने भूमिका करावी अशी इच्छाही करणची होती. मात्र, यावर विजयने नकार दिला आहे.
'अर्जुन रेड्डी' या तेलुगु चित्रपटात विजय देवराकोंडाने भूमिका केली होती. तो चित्रपट खूप गाजला. त्याचाच हिंदीत 'कबीर सिंह' हा रिमेक झाला, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळालाय. या पार्श्वभूमीवर विजयचा 'डियर कॉम्रेड' हिंदीत करण्याचा निर्णय करणने घेतला होता.
याबद्दल एका मुलाखतीत बोलताना विजय म्हणाला, "हिंदी चित्रपट करणे रंजक आहे. मात्र, मला हिंदी आणि तेलुगुत असेल, असे काही तरी करायचे आहे. मला स्वतःला अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होताना पाहायचे नाही. मला आळशी जीवनशैली आवडते. मी रोज पाच लोकांसोबत काम करु शकत नाही. यातून कदाचित सर्व उद्देश पूर्ण होत असतील, परंतु हे मला आवडणारे नाही. मला वाटते मुंबई माझ्यासाठी खूपच वेगवान आहे. मला माझ्या अटींवर काम करणे पसंत आहे."